मुरगूड (शशी दरेकर) : निढोरी,तालुका कागल येथील एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सुनिल श्रीपती रंडे, (वय ४०),रा.निढोरी,ता.कागल याच्यावर मुरगूड पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.
निढोरी,(ता.कागल) येथील सुनिल श्रीपती रंडे, (वय ४०) हा विवाहित आहे . त्याने आपल्या राहत्या घरी पिडीत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करुन घरी कोणालाही सांगू नको,नाहीतर तुला आणि तुझ्या मामाला ठार मारुन टाकीन अशी धमकी दिल्याची तक्रार मुरगूड पोलीसात पिडीत मुलीने दिली आहे.
Advertisements

त्यानुसार सुनिल रंडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सपोनि क्रांती पाटील अधिक तपास करीत आहेत.