कागल (प्रतिनिधी) : भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोराची धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली. हा अपघात सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील जयसिंगराव पार्क तलाव कमानी जवळ रस्ता ओलांडताना घडला. श्रीमती सुशीला प्रल्हाद माने वय वर्षे 63 मुळगाव राहणार -अकिवाट तालुका शिरोळ, सध्या राहणार – नेर्ली तालुका करवीर असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
मयत महिला ही कागल ग्रामीण रुग्णालयात औषध उपचारासाठी गेली होती. तेथून ती रस्ता ओलांडत असताना कोल्हापूरहून भरधाव वेगाने आलेला ट्रक क्रमांक जीए – झिरो – आठ – यु 9004 हा कागल कडे येत होता. ट्रकची ठोकर जोरात बसल्याने ती जागीच ठार झाली.
मुंबई हुन गॅस घेउन ट्रक बेंगलोर कडे चालला होता.ट्रक चालक सुभाष नानाप्पा राठोड वय वर्षे 32 राहणार व्हन्याळ, तालुका -बेळगी, जिल्हा बागलकोट यास कागल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास कागल पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार कोचरगी हे करीत आहेत.