बातमी

कागल नगरपालिकेचा ११५ वा वर्धापन दिन

कागल : कागल नगरपरिषदेचा ११५ वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त पालिकेत ध्वजवंदन सोहळा पार पडला. कागलचे अधिपती आणि नगरपरिषदेचे संस्थापक श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. पालिकेचे कर्मचारी आणि सर पिराजीराव घाटगे विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी पालिकेत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कागलचे अधिपती आणि कागल नगरपरिषदेचे संस्थापक श्रीमंत पिराजीराव घाटगे तथा बापूसाहेब महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांच्याहस्ते करण्यात आले.

तसेच श्रीमंत पिराजीराव घाटगे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे, दस्तगीर पखाली, बाळासो माळी, पॉल सोनुले, रूपेश सोनुले यांच्यासह पालिकेचे विभागप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *