ह्या ताखेपासून मिळणार कोविडचा दुसरा डोस

कोल्हापूर :  जिल्ह्याला  13 ऑगस्ट रोजी  १ लाख ३९ हजार कोविशल्ड लस प्राप्त होत आहेत. यामुळे कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देय असणा-या लाभार्थ्यांसाठी शनिवार दि. 14 ऑगस्ट 2021  रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व ( इचलकरंजी) या ठिकाणी प्राधान्याने कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस किमान २०० लाभार्थ्याना देण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या नजिकच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क करुन कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस वेळेत पूर्ण करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Advertisements

मागील काही कालावधीत जिल्ह्याला कमी प्रमाणात लस उपलब्ध झाल्याने कोविशिल्ड लसीचे दुस-या डोसचे लाभार्थी मोठया प्रमाणात शिल्लक (१ लाख २९ हजार) राहिल्याचे सॉप्टवेअरमध्ये निदर्शनास येत आहे. जिल्हयामध्ये १६ जानेवारी पासून कोविड लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबध्द पध्दतीने सुरु आहे. कोल्हापूर जिल्हा कोविड लसीकरणाच्या बाबतीत अग्रेसर असुन यासाठी जिल्हयातील सर्व मंत्री महोदय, खासदार, आमदार व जिल्हा परिषद सदस्यांकडून वेळोवेळी सहकार्य मिळत आहे.

Advertisements

गरोदर मातांसाठी देखील कोविड लसीकरण सुरक्षित असून हे व्हॅक्सीन सर्व गरोदर मातांनी लवकरात लवकर घ्यावी अशी शिफारस स्त्री रोग तज्ञांनी केली आहे. गरोदर मातांनी कोविडची लस घेतल्यानंतर गरोदर माता व तिचे बाळ दोघांनाही कोविड आजारापासुन सुरक्षितता प्राप्त होणार आहे. गरोदरपणातील व प्रसुतीनंतर कोविड आजार व त्यासंबंधीच्या गुंतागुंती टाळण्यासाठी गरोदर मातांनी कोविडची लस घेणे गरजेचे आहे. दर सोमवारी तालुक्याच्या ठिकाणी गरोदर मातांसाठी आयोजित विशेष लसीकरण सत्राचा लाभा घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील आणि बांधकाम व आरोग्य सभापती वंदना जाधव यांनी केले आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!