वृक्षमित्र प्रवीण सुर्यवंशी यांचा  गणवेश वाटप उपक्रम प्रेरणादायी –  अविनाश चौगले

सातत्यपूर्ण उपक्रमाचे हे ३५ वे वर्ष. सेवानिवृत्तीनंतरही सुरू आहे स्तुत्य उपक्रम

मुरगूड (शशी दरेकर) : येथील शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेज मुरगूडचे माजी उपमुख्याध्यापक वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांच्या कडून शिवराज विद्यालय मधील गरजू व होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनींना स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.  

Advertisements

    याप्रसंगी बोलतांना कोजिमाशिचे माजी चेअरमन अविनाश चौगले म्हणाले, लोकनेते स्व.सदाशिवराव मंडलिक आणि माजी नगराध्यक्ष स्व.चंद्रकांत वाडेकर यांच्या प्रेरणेतून आणि निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या आजच्या आचार- विचारातून १९९२  सालापासून वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी हे शाळेतील गरजू व होतकरू  विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करत आहेत. त्यांच्या उपक्रमाचे हे ३५ वे वर्ष आहे. ३१ मे २०२६ रोजी ते उपमुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत झाले नंतरही त्यांनी हा त्यांचा स्तुत्य उपक्रम पुढे चालू ठेवला आहे हे कौतुकास्पद आहे.

Advertisements

वृक्षमित्र सुर्यवंशी हे शालेय विद्यार्थ्यांकडून विविध वृक्षांच्या बियांचे संकलन करून गेल्या ३० वर्षापासून त्यांनी लाखो रोपांची निर्मिती व त्यांचे मोफत वाटप करण्याचा अविरत प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यामुळेच एक माध्यमिक शिक्षक ते पर्यावरण प्रेमी वृक्षमित्र अशी ओळख असलेल्या प्रवीण सुर्यवंशी यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. तीच त्यांच्या कार्याची पोचपावती असल्याचे गौरवोद्गार श्री.चौगले यांनी काढले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही बी खंदारे होते. उपप्राचार्य ई व्ही चौगुले,उपमुख्याध्यापक एस जी पोवार, व्होकेशनल विभाग प्रमुख आर बी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. स्वागत प्रस्ताविक पी डी रणदिवे यांनी, सूत्रसंचालन एस एस सुतार यांनी, तर आभार कलाध्यापक संदीप मुसळे यांनी मानले.

Advertisements

    यावेळी ज्येष्ठ अध्यापक बी वाय पाटील, आर ए जालीमसर, पी एम फासके, प्रा. ए ए पाटील, प्रा सिकंदर शिकलगार, पी डी रणदिवे, एस एस पाटील, सुरेश सुतार,  जितेंद्र मिठारी, श्वेता चौगुले, मयुरी लोंढे, एल पी सारंग, कोमल बुवा, सुऱ्याप्पा मेटकर, संजय मांगले, शशिकांत सुतार यांचे सह शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!