कागल (विक्रांत कोरे) : करनूर तालुका कागल येथील करनूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे 80 वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.
Advertisements
महाराष्ट्र छात्रसेनच्या विद्यार्थ्यांची मानवंदना झाल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शोकरा मुजावर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. वंदेमातरम् ,राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्यगीत गायनानंतर इ.१०वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉपीमुक्त परीक्षेबाबत शपथ घेण्यात आली.
Advertisements

प्रभातफेरीचे रामकृष्ण नगरातून आयोजन करण्यात आले. भारतमातेच्या जयघोषाने सारा परिसर दुमदुमून गेला होता. याप्रसंगी करनूर ग्रामस्थ, आजी -माजी विद्यार्थी – विद्यार्थिनी, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.