मुरगूड नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी सम्राट मसवेकर, विजय मेंडके यांची  निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगुड नगरपालिकेच्या स्विकृत नगरसेवक पदी सम्राट भरत मसवेकर,विजय कृष्णात मेंडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Advertisements

  सध्या मुरगुड नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे गट यांची सत्ता आहे. माजी खासदार संजय दादा मंडलिक व माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या .मुरगुड नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासन अधिकारी नगराध्यक्ष सुहासिनीदेवी पाटील होत्या .उपनगराध्यक्ष श्रीमती रेखा मांगले , गटनेते सुहास खराडे प्रमुख उपस्थित होते.

Advertisements

   माजी स्वीकृत सदस्य सुनील मंडलिक व राहुल शिंदे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवड करण्याकरता ही सभा आयोजित करण्यात आली होती .यावेळी सम्राट भरत म्हसवेकर व विजय कृष्णात मेंडके या दोघांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे पिठासन अधिकारी नगराध्यक्ष सुहासिनी देवी पाटील यांनी जाहीर केले.

      स्वागत रणजीत निंबाळकर  प्रास्ताविक नगराध्यक्ष सुहासिनी  पाटील यांनी केले. यावेळी युवा नेते दिग्विजयसिंह पाटील,
नगरसेवक सुहास खराडे,एस व्ही चौगले, दत्तात्रय मंडलिक, सत्यजितसिंह पाटील, सुनील रणवरे ,जयसिंग भोसले, नामदेव मेंडके, संजीवनी कांबळे यांची भाषणे झाली.
    यावेळी नगरसेवक रणजित भारमल, राजू आमते, विजय राजिगरे, नगरसेविका गीतांजली आंगज, सुजाता पुजारी ,वैशाली गोधडे, विजयमाला शिंदे, सुरेखा लोकरे,जगन्नाथ पुजारी,राजेंद्र चव्हाण,संजय मोरबाळे,संजय भारमल,प्रविण लोहार,विजय मेंडके, राजू जमादार ,राहुल वंडकर ,प्रशांत मोरबाळे,  भुषण मसवेकर आदी प्रमुख उपस्थित होते. आभार अनिल राऊत यांनी मानले .

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!