कागल : कागल आर टी ओ नाक्या जवळ हायवे वर थांबलेल्या कंटेनर( GJ O1 JT 2231) ला मागून स्कॉर्पिओ गाडी (MH O2 EU 3576) ने जोराची धडक दिली. स्कॉर्पिओ गाडीच्या ड्रायव्हरला झोप लागली आणि त्याने झोपेत थांबलेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिली त्यामुळे गाडीचा पुढील भाग कंटेनरमध्ये अडकला.
आणि ड्रायव्हर व त्याचा बरोबर असणारा व्यक्ती एअर बॅग वेळेत उघडल्याने वाचली. ड्रायव्हर डॅरीश जेसॅन्टो व त्याचा मामे भाऊ मेलकम गलभानो हे गोवातून मुंबई कडे जात होते. त्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर कागल येथील संग्राम लाड व स्थानिक नागरीकांच्या व पोलिसाच्या मदतीने त्या दोघांना गाडीतून बाहेर काढले.