
मुरगूड ( शशी दरेकर ) : सदाशिवराव मंडलिक इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग,मध्ये शपथविधीचा (lamp lighting & Oath taking) कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक कोल्हापूर डॉ सुप्रिया देशमुख या प्रमुख पाहुण्या होत्या अध्यक्षस्थानी संस्था कार्याध्यक्ष व युवानेते ॲड. विरेंद्र मंडलिक होते.
कार्यक्रमाची सुरवात ही दिप प्रज्वलाने झाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख यांनी विद्यार्थ्याना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. विरेन्द्रसिंह संजय मंडलिक यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांसमोर भविष्यात काही अडचणी आल्यास कायम तुमच्या पाठीशी तत्पर राहीन असे आश्वासन दिले.

यानंतर शपथविधीचा कार्यक्रम पार पडण्यात आला त्यावेळी कॉलेजच्या प्राचार्या प्रो. सुशीला लांबा यांनी विद्यार्थ्यांना शपथ ग्रहण करून दिली . व भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यवाह आण्णासो थोरवत ,सुनिल मंडलिक , प्राचार्य यु.आर शिंदे , प्राचार्य शिवाजी होडगे, , यू बी पाटील, उदय शेटे आदि मान्यवरासह विद्यार्थी , पालक , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते .
I have read some good stuff here. Definitely worth bookmarking for revisiting. I wonder how much effort you put to create such a wonderful informative web site.
I like what you guys are up also. Such smart work and reporting! Carry on the superb works guys I’ve incorporated you guys to my blogroll. I think it will improve the value of my site :).