मुरगुड येथे गाईने दिला दोन तोंडे तीन डोळयांच्या वासराला जन्म

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथे निसर्गाचा अदभूत चमत्कार पाहावयास मिळाला.येथील प्रशांत रंगराव मोरबाळे यांचा मुरगुड येथील भावेश्वरी चौक येथे गोठा आहे. त्या ठिकाणी त्यांनी अलिकडेच एक गाय विकत घेतली होती.

Advertisements

आज त्या गाईने चक्क दोन तोंडे व तीन डोळे असलेल्या वासराला जन्म दिला या वासराला तीन डोळे आणि दोन तोंडे असून संपूर्ण काळ्या रंगाचे हे वासरू धडधाकट आहे मात्र डॉक्टरांनी काळजी घेण्याची गरज आहे असे सांगितले आहे .प्रशांत आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय या वासराची योग्य काळजी  घेत आहेत.

Advertisements

सोशल मीडियाच्या माध्यमातून मुरगुडच्या कानाकोपऱ्यात ही बातमी पोहोचल्यानंतर या वासरास पाहण्यासाठी मुरगूडकर व परिसरातील नागरीकानीं या वासराला पहाण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

Advertisements
AD1

2 thoughts on “मुरगुड येथे गाईने दिला दोन तोंडे तीन डोळयांच्या वासराला जन्म”

  1. Good site! I truly love how it is easy on my eyes and the data are well written. I’m wondering how I might be notified when a new post has been made. I have subscribed to your feed which must do the trick! Have a nice day!

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!