बातमी

मुरगूडच्या श्री. गणेश नागरी सहकारी संस्थेच्या सभापती पदी सुखदेव येरुडकर तर उपसभापती पदी मारूती पाटील यांची निवड

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड पंचक्रोशीत अग्रगन्य समजल्या जाणाऱ्या मा. खासदार कै. सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या आशीर्वादाने प्रगतीपथावर असलेल्या व शंभर कोटीचा टप्पा पार करून सहकार क्षेत्रात सर्वत्र नावलौकिक मिळवलेल्या मुरगूडच्या श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. सुखदेव गणपती येरूडकर यांची तर उपसभापती श्री. मारुती गणपती पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.

पतसंस्थेच्या २०२३-२०२४ या वार्षिक सालाकरीता मा. सहाय्यक निबंधकसो श्री. जांभोरकर सहकारी संस्था कागल यांच्या अध्यक्षतेखाली व श्री अमर शिंदे यांच्या उपस्थितीत सभापती व उपसभापती यांची निवड प्रक्रिया पार पडली.

या निवड प्रसंगी संचालक सर्वश्री उदयकुमार शहा , एकनाथ पोतदार, आनंदराव देवळे, प्रकाश हावळ, राजाराम कुडवे, दत्तात्रय कांबळे, आनंद जालिमसर, संचालिका सौ. रुपाली शहा, सौ. रेखा भोसले, कार्यलक्षी संचालक राहूल शिंदे कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *