बातमी

डी आर माने महाविद्यालयाच्या हिमालयासारखा पाठीशी – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

महाविद्यालयाच्या ५० लाखांच्या सभागृहाची पायाभरणी

कागल, दि.११: कागलचे डी आर माने महाविद्यालय हे शहरासह तालुक्याच्या शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मोठे केंद्र आहे. या महाविद्यालयाच्या पाठीशी सदैव हिमालयासारखा मी उभा आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कै. वाय डी माने – अण्णा यांनी प्रतिकूल परिस्थितीतून मोठ्या संघर्षातून वाटचाल करीत समाजाला दिलेली ही मोठी देणगी आहे, असेही ते म्हणाले.

डी आर माने महाविद्यालयाच्या परिसरात राज्यसभेच्या खासदार श्रीमती वंदना चव्हाण यांच्या ५० लाख निधीतून सुसज्ज व अद्ययावत सभागृह होणार आहे. त्याची पायाभरणी मंत्री मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाली. भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, स्वर्गीय कै. वाय. डी. माने- अण्णा यांनी अत्यंत परीस्थितीत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करीत या महाविद्यालयाची स्थापना केली व ते पुढे चालविले. त्यांनी १९८४ साली लावलेल्या ईवल्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. या महाविद्यालयाला शासकीय पातळीवर कोणतीही अडचण येऊ देणार नाही. नेहमीच या महाविद्यालयाच्या पाठीशी उभा राहीन, असेही ते म्हणाले.

आयटी पार्क सुरु करा………
भाषणात प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत आयटी पार्कसाठी शंभर एकर जागा राखीव ठेवलेली आहे. या जागेवर माहिती -तंत्रज्ञान क्षेत्राशी मोठे उद्योग व कंपन्या येऊन हा पार्क सुरू होणे गरजेचे आहे. त्यामुळे कागल शहरासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला महत्त्व येईल. 

प्रसंगी जमीन विकेन…..
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वर्गीय वाय. डी. माने -आण्णा यांनी या शिक्षण संस्थेची स्थापना केल्याचे सांगतानाच मंत्री मुश्रीफही भाऊक झाले. त्याकाळी संस्था चालविताना अनंत अडचणी आल्या होत्या. त्यावेळी काही देणगीदार पुढे आले, परंतु त्यांनी महाविद्यालयाचे नाव बदलण्याची अट घातली होती. त्यावेळी कै. वाय डी माने -अण्णा यांनी प्रसंगी जमीन विकेण परंतु, वडिलांचे दिलेले नाव बदलणार नाही, असा पवित्रा घेतल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

व्यासपिठावर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सुनील माने, सौ नंदाताई माने, कु. निकिता माने, सार्वजनिक बांधकामचे उप अभियंता डी.व्ही शिंदे, संचालक वाय. डी. चव्हाण, संचालक बिपिन माने, श्रीमती मीनाताई घाग, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, संजय चितारी, सतीश घाडगे, आनंदा पसारे, बाबुराव पुंडे, सुनील माळी आदी प्रमुख उपस्थित होते.

स्वागत प्राचार्य डॉ. प्रविण चौगुले यांनी केले. प्रास्ताविक दि कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केले. सूत्रसंचालन सौ. ए. के. जगताप यांनी केले. आभार डॉ. ए. डी. गाडे यांनी मानले.

फोटो ओळी : कागल -डी. आर. माने महाविद्यालयाच्या ५० लाख खर्चाच्या सुसज्ज व अद्ययावत सभागृहाच्या पायाभरणीच्या कोनशिला अनावरण प्रसंगी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यावेळी प्रताप उर्फ भैय्या माने, डी. व्ही. शिंदे, प्राचार्य डॉ. प्रविण चौगले व इतर प्रमुख

……..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *