जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करा

कोल्हापूर, दि. 24 (जिमाका):  ल्योन, फ्रांस येथे आयोजित केलेल्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास इच्छुक पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/  किंवा https://forms.gle/Svbrdnw8gsh2bgWH7 या लिंकवर दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या प्र. सहायक आयुक्त संगीता खंदारे यांनी केले आहे.

Advertisements

सन २०२४ मधील ल्योन, फ्रांस येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा जिल्हा, विभाग, राज्य व देश पातळीवरुन प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे मानांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरिता सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये,  MSME Tool Rooms, CIPET, IIT, Maharashtra State Skill University, MSBVET, Private Skill University, Fine Arts College, Flower Training Institute, Institute of Jewellary making प्रशिक्षण संस्था, तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

Advertisements

स्पर्धेकरिता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आला असून स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म दि.1 जानेवारी, २००२ किंवा तदनंतरचा असणे अनिवार्य आहे.

Additive Manufacturing, Cloud Computing, Cyber Security, Digital Construction, Industrial Design Technology, Industry 4.0, Information Network Gabling, Mechatronics, Robot System  Integration & Water Technology  या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म दि.१ जानेवारी, १९९९ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.

Advertisements

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सी बिल्डिंग, शासकीय निवासस्थान, विचारे माळ, कावळा नाका  कोल्हापूर  येथे प्रत्यक्ष अथवा ०२३१-२५४५६७७ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे  आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!