मुरगूडातील केवळ २ किमी अंतराच्या  कामासाठी तब्बल साडेचार महिने, संतप्त नगरसेवकांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना धरले धारेवर

गडहिंग्लज – कागल रस्त्याच्या पूर्ततेसाठी पुन्हा तिसरी बैठक, कामाच्या पुर्ततेसाठी २ ऑगस्ट नवी डेडलाईन

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड शहरातील केवळ २ किमी अंतराच्या  कामासाठी तब्बल साडेचार महिन्याहून अधिक काळ उलटल्यामुळे नगरसेवक संतापले. बैठकीत नगरसेवकांनी रस्ते प्रकल्प अधिकाऱ्यांना चांगलेच  धारेवर धरले. शहरातील रस्ता २ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन रस्ता प्रकल्प विभागाचे ॲथॉरिटी इंजिनियर प्रदीप तिवारी यांनी दिले. 

Advertisements

           कागल-गडहिंग्लज रस्त्यापैकी  सर पिराजीराव तलाव – हुतात्मा तुकाराम चौक ते नाका नंबर १ हा मार्ग मुरगूड शहरांतर्गत येतो. या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने चालू असल्याचा आरोप करत पालिकेच्या नगरसेवकांनी रस्ता प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Advertisements

          यावेळी रस्ता प्रकल्पाचे प्रदीप तिवारी, रस्ता प्रकल्प व्यवस्थापक सतीश चौगले, डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर शरीफ महम्मद, अभियंता एम. एम. कुंभार,अभियंता विजय चौगले, पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी अतिश वाळुंज, पक्षप्रतोद सुहास खराडे, नगरसेवक शिवाजी चौगले, दत्तात्रय मंडलिक ,दिपक शिंदे, विक्रम गोधडे,राजू कांबळे , नगर अभियंता प्रदीप देसाई, पाणीपुरवठा अभियंता रोहित आतवाडकर, तुषार कांबळे, शशी पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.

            लेखी आश्वासनात तुकाराम चौक ते सर पिराजीराव तलाव रस्त्याचे २ ऑगस्ट पर्यंत फायनल काँक्रीटीकरण करणे, पावसाळ्या नंतर तुकाराम चौक ते बस स्टँड पर्यंतचा रस्ता करणे, बसस्टँड समोर रस्त्यावर खोलगट भाग कच्चे काँक्रिट टाकून भरून घेणे. गटारी व पाईप लाईनच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे नमूद केले आहे.

Advertisements

………….. तर फौजदारी गुन्हा !

            यावेळी नगरसेवक दत्तात्रय मंडलिक यांनी रस्ता कामात आम्ही पदाधिकारी तुमच्या एक रुपयात मिंधे नाही. रस्त्याबाबत आम्ही तुम्हाला बोलत नाही म्हणून नागरिकांचा गैरसमज आहे . त्यामुळे आम्ही तुम्हाला पोटतिडकीने बोलतोय . येत्या दोन महिन्यात शहरातील कामे पूर्ण झाली नाही तर तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Leave a Comment

error: Content is protected !!