पुणे विभागात कागलचा डबल धमाका! पंचायत समिती आणि आरोग्य विभाग अव्वल !

मुख्याधिकारी कार्तिकेयन एस., बीडीओ बोंगे आणि डॉ. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कागल पंचायत समिती आणि आरोग्य विभागाने रचला यशाचा नवा अध्याय कागल / प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवस प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत पुणे विभागातयेणाऱ्या ५३ तालुक्यांमधून कागल पंचायत समितीने व तालुका आरोग्य विभागाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.          दि. ७ जानेवारी ते ३० एप्रिल या दरम्यान … Read more

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत मान्सूनपूर्व नालेसफाई आणि व्यापक वृक्षारोपण मोहिमेला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत सध्या मान्सूनपूर्व तयारी आणि पर्यावरण संवर्धनाच्या दुहेरी मोहिमेने सज्ज झाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) पुढाकाराने सुरू असलेल्या नालेसफाई मोहिमेला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यंदा व्यापक वृक्षारोपण कार्यक्रमावर विशेष भर दिला जात आहे. गेल्या पाच दिवसांपासून गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत युद्धपातळीवर नालेसफाई … Read more

विकासवाडीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साकारणार; आमदार अमल महाडिक यांनी केली पाहणी

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विकासवाडी (ता. करवीर) येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार आहे. या नियोजित स्टेडियमच्या जागेची पाहणी आमदार अमल महाडिक यांनी नुकतीच केली. यावेळी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार स्वप्नील रावडे आणि भूमापन अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर शहरापासून अवघ्या १५ ते २० कि.मी. … Read more

मुरगूड बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते २३ मे रोजी सभासदांना भेटवस्तू प्रदान समारंभ

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथील विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवार दि. २३ मे रोजी सकाळी दहा वाजता मुरगूड येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तू प्रदान समारंभ आयोजित केला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ राहणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन प्रवीणसिंह पाटील यांनी पत्रकार … Read more

लोकशाहीत संघटनेला महत्त्व; गजाननराव गंगापुरे

मुरगुड शहर ज्येष्ठ नागरिक संघाची 15 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत; ज्येष्ठांचा सत्कार मुरगूड ( शशी दरेकर ) : जेष्ठांचा , नागरिकांचा उर्वरित काळ आनंदाचा व तणावमुक्त जावा ,त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यात संघ सतत कार्यरत असून त्यासाठी विविध उपक्रम राबवत असल्याची माहिती मुरगुड शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे यांनी दिली. मुरगूडच्या ज्येष्ठ नागरिक … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३६ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३६ दिनांक १९-०५-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

कागल मध्ये तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंदूर च्या यशानंतर तिरंगा यात्रेचे आयोजन

व्हनाळी : देशभरात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर ठिकठिकाणी भारतीय बांधव आणि विविध पक्ष संघटनेच्या माध्यमातून तिरंगा यात्रा काढून सैनिकांच्या धैर्याला सलाम करण्यात आला.  भारतीय सशस्त्र दलांनी नुकत्याच यशस्वी केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या सन्मानार्थ कागल येथे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.  या यात्रेंमध्ये माजी सैनिक, विविध मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  कागल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज … Read more

कागलमध्ये राष्ट्रीय डेंग्यू दिन उत्साहात संपन्न

कागल (सलीम शेख) : दि. १६ मे  राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त कागल शहरात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालय, कागल येथे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे रुग्णालयात उपस्थित नागरिक आणि रुग्णांना डेंग्यू, चिकुनगुनिया आणि हिवताप या आजारांविषयी सविस्तर माहिती दिली. या वेळी या आजारांची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर मार्गदर्शन करण्यात आले. … Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली ? मानवाधिकार आयोगाचा राज्यांना सवाल

धोकादायक कचऱ्याची सफाई हाताने करण्याच्या पद्धतीचे उच्चाटन करावे नवी दिल्ली : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आज धोकादायक कचरा सफाईच्या संदर्भात राज्यांना थेट सवाल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या १४ स्पष्ट निर्देशांनंतरही, आजही काही भागांमध्ये हाताने सफाईची पद्धत सुरू असल्याबद्दल आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांना पाठवलेल्या पत्रात … Read more

कागलजवळ भीषण अपघात: गोकुळ शिरगावच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

कागल ( प्रतिनिधी ) : कागल अपघातात एका मोटरसायकल स्वाराचा मृत्त्यु झाला. आनंद पाल राहणार गोकुळ शिरगाव असे मयत इसमाने नाव आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सूमारास महामार्गावरील लक्षमी टेकडी जवळ घडला. अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या परीस्थिती कडे दुर्लक्ष करुन कार नंबर ka-23-n-7815 ही ट्रेलरला ओव्हरटेक … Read more

error: Content is protected !!