मुरगुड येथील एनसीसी विभागातर्फे जल उत्सव उपक्रम साजरा

मुरगुड ( शशी दरेकर ): कोल्हापूर येथील ५ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अंतर्गत मुरगुड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाने २६ डिसेंबर २०२५ रोजी जल जीवन मिशन अंतर्गत जल उत्सव यशस्वीरित्या साजरा केला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, एनसीसी कॅडेट्सनी जल संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मुरगुड येथील सर पिराजी तलावाच्या स्वच्छतेत सक्रिय … Read more

सावर्डे बु॥ येथिल साईबाबा मंदिराचा २३ वा वर्धापनदिन सोहळा शुक्रवारी

वर्धापन दिनानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन मुरगूड ( शशी दरेकर ) : सावर्डे बु॥ ( ता. कागल ) येथिल “ओमसाई” मंदिराचा २३ वा वर्धापनदिन सोहळा शुक्रवार दि. २६ / १२ / २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. साईबाबांच्या कृपाशिर्वादाने व प्रेरणेने हा वर्धापनदिन व साईबाबाचा भंडारा भक्तीभावाने साजरा होत असून त्यानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन केले … Read more

धोकादायक सिद्धनेर्ली प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र

जीव धोक्यात घालून सेवा! प्रशासनाचे दुर्लक्ष, रुग्णसेवेवर परिणाम सिद्धनेर्ली : कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली येथील प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्राच्या इमारतीची निर्मिती सुमारे गेल्या ३५ ते ४० वर्षां पूर्वीची आहे.  दुरुस्ती न झाल्याने सध्या तिची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे. जीर्ण झालेल्या या मोडकळीस आलेल्या इमारतीत डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना अक्षरशः जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करावी लागत आहे, … Read more

हळदवडेत तरुणाचा गळफास घेतल्याने मृत्यू

मुरगूड ( शशी दरेकर ) हळदवडे तालूका कागल येथील ओंकार दतात्रय येजरे वय २३ याचा मंगळवारी सायंकाळी साडेपाच पूर्वी नॉयलॉनचे दोरीने गळफास घेतल्याने मृत्यू झाला. घटनेची नोंद मुरगूड  पोलीसात झाली आहे.     याबाबतची  मुरगूड पोलीसातून मिळालेली माहिती अशी मयत ओंकार यांने कशाच्या तरी नैराशेतून दौलतवाडी तालूका कागल येथील बेलेकर नावाच्या शेतात झाडाला नॉयलॉन दोरीने गळफास … Read more

निसर्गाची साथ! यंदा ज्वारीचे पीक जोमात; कागल तालुक्यासह जिल्ह्याचा बळीराजा सुखावला

सिद्धनेर्ली : यंदा हिवाळ्यातील पोषक हवामान आणि गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या ज्वारीची स्थिती अत्यंत समाधानकारक आहे. जिल्ह्याच्या विविध भागांत सध्या ज्वारीचे पीक जोमात आले असून, माळरानावर हिरवीगार पिके डोलताना दिसत आहेत. यंदा थंडीचे प्रमाण पिकाला हवे तसे लाभल्याने ज्वारीच्या दाण्यांचा टपोरेपणा आणि कडब्याची गुणवत्ता वाढण्यास मोठी मदत … Read more

निधन वार्ता – साताप्पा हळदकर

लोकनेते दिवंगत सदाशिवराव मंडलिकसाहेब यांचे मानसपुत्र व शिवराज विद्यालायाच्या आद्य शिक्षिका स्वर्गीय विजयमाला मंडलिकबाई यांचे लाडके विद्यार्थी म्हणून ओळखले जाणारे मंडलिक गटाचे एकनिष्ठ शिलेदार कुटुंबाशी अखेरच्या श्वासापर्यंत निष्ठेने व समर्पित भावनेने कार्यरत असलेले संयमी व प्रेमळ व्यक्तिमत्व साताप्पा शिवाजी हळदकर ( वय ७५ ) आज काळाच्या पडद्याआड गेले. अलीकडे ते आजारी होते. आजारपण वाढत गेल्यानंतर … Read more

निधन वार्ता – शेवंता महादेव चांदेकर

मुरगूड प्रतिनिधी – मुरगुड ता. कागल येथील शेवंता महादेव चांदेकर वय ८८ यांचे वार्धक्याने निधन झाले . त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुरगूडचे माजी नगरसेवक बाजीराव चांदेकर तसेच आनंदा व नामदेव चांदेकर यांच्या त्या आई होत. उत्तर कार्य शुक्रवार दिनांक २ रोजी मुरगूड येथे आहे.

वाचा गहिनीनाथ समाचार अंक १६ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक १६ दिनांक २२-१२-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २७ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

माणुसकीचे दर्शन: कागलमध्ये अर्धशुद्ध अवस्थेतील रुग्णाला प्रशासनाकडून जीवदान

पोलिसांच्या ‘सकारात्मक दबावा’नंतर नातेवाईक आले धावून कागल(प्रतिनिधी) :कागल नगरपालिका शाळेच्या बाहेर गेल्या दोन दिवसांपासून अर्धशुद्ध आणि गँगरीनने अत्यंत गंभीर झालेल्या अवस्थेत पडलेल्या एका व्यक्तीला नगरपालिका प्रशासन आणि पोलीस विभागाने तत्परता दाखवत जीवदान दिले आहे. प्रशासनातील समन्वयाचा आणि माणुसकीचा एक विदारक पण प्रेरणादायी अनुभव आज कागलमध्ये पाहायला मिळाला. नेमकी घटना काय? ​कागल नगरपालिका शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर एक … Read more

पिंपळगाव खुर्दच्या शासकीय होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या जागेचा पेच सुटला             

तलावापासून काही अंतरावर होणार स्थलांतर – मंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश पिंपळगाव खुर्द, दि. २२: पिंपळगाव खुर्द ता. कागल येथील शासकीय होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि दवाखान्याच्या जागेचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. यासंदर्भात राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आज स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पिंपळगाव खुर्द येथे भेट देऊन … Read more

error: Content is protected !!