‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहिदांचा अपमान; राजनाथ सिंह आणि मोदी सरकारवर गंभीर आरोप

नवी दिल्ली: २८ जुलै २०२५ रोजी संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत चर्चा सुरू असताना, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या उत्तरावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांनी आणि काही प्रसारमाध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार, या ऑपरेशनमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाबद्दल सरकारने सभागृहात चुकीची माहिती दिली असून, हे शहीद जवानांचा अपमान असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisements

काय आहे प्रकरण?

Advertisements

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये देशाचे सहा जवान शहीद झाले होते. मात्र, सरकारने ही बाब संसदेत नाकारली आणि त्याऐवजी देशवासियांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. या

ऑपरेशनमध्ये प्राण गमावलेल्या सहा शूर जवानांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

Advertisements

सुभेदार मेजर पवन कुमार: मुख्यालय, १० इन्फंट्री ब्रिगेड
रायफलमॅन सुनील कुमार: ४ जम्मू अँड काश्मीर लाईट इन्फंट्री
लान्स नायक दिनेश कुमार: ५ फील्ड रेजिमेंट (वीर चक्र)
मुरलीनायक: ८५१ लाईट रेजिमेंट (एव्हिएशन टेक्निशियन)
हवलदार सुनील कुमार सिंग: २३७ फील्ड वर्कशॉप कंपनी
सार्जंट सुरेंद्र कुमार: ३९ विंग (भारतीय वायु सेना – वायु सेना पदक)

या शहिदांच्या बलिदानावर पडदा टाकल्यामुळे मोदी सरकारवर तीव्र टीका होत आहे. राजनाथ सिंह यांनी संसदेत असत्य माहिती दिल्याने ही संसदेची अवमानना असल्याचे सांगितले जात आहे. काही विश्लेषकांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी ही माहिती लपवल्याचा गंभीर आरोपही केला जात आहे. आता या प्रकारामुळे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माफी मागावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!