कागल : 15 ऑगस्ट 2026 इ.रोजी नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिर कागल शाळेमध्येकागल नगर परिषद कागल च्या नगरसेविका माननीय सौ पूनम शिवाजी मोरे यांच्या शुभहस्ते व भाग शाळा जयसिंगराव पार्क येथे कागल नगरपरिषद कागल शिक्षण समिती सदस्या माननीय श्रीमती रंजना दिलीप सनगर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम नगरसेवक नगरसेविका शिक्षकवृंद विद्यार्थी व नागरिक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे संगीतमय कवायत देशभक्तीपर गीत गायन व प्रतिज्ञाअशा विविध कार्यक्रमाने सहभाग घेतला

मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री सागर नदाफ व शिक्षक सचिन गाडेकरआणि कृष्णात पाटील श्रीमती राणे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती विद्या बुजरे मॅडम व सौ शुभांगी गाडेकर यांनी केले