गुंठेवारी खरेदी-विक्री सुरु करण्याची मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे मुरगूड मधील शेतकऱ्यांची मागणी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड,ता.११ : ऑगस्ट २०१९ पासून राज्य शासनाने जमीन खरेदी विक्रीबाबत अनेक प्रकारच्या जाचक अटी घातल्यामुळे गुंठेवारी खरेदी – विक्री व्यवहार बंद आहेत. परिणामी त्याचा अल्पभूधारक शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसत आहे. यासाठी शासनाने तात्काळ ही गुंठेवारी खरेदी – विक्री सुरु करावी. या मागणीचे निवेदन मुरगूडमधील जमीनधारकांनी आमदार प्रकाश आबिटकर … Read more

मुरगूडमध्ये शिवप्रेमीतर्फे स्व. सदाशिवराव मंडलिक यांना विनम्र अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल बाजारपेठ शिवप्रेमीतर्फे लोकनेते स्व . सदाशिवराव मंडलिक यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्य विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रथम स्व. मंडलिक साहेबांच्या प्रतिमेचे पूजन श्री. मधूकर मंडलिक ( गुरुजी ) यांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर दोन मिनिटे स्तब्धता पाळून लोकनेते मंडलिक साहेबानां श्रद्धांजली वाहण्यात आली. … Read more

लोकनेते मंडलिक यांच्या स्मृतिदिनानिमित्य उद्या विविध उपक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ) : हमिदवाडा ता. कागल येथिल सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचा सातवा स्मृतिदिन उद्या गुरुवार दि. १o रोजी सकाळी ११ वाजता कारखाना कार्यस्थळावर विविध उपक्रमानी साजरा होत आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सागर देशपांडे उपस्थित राहणार आहेत. तर बाबासाहेब यशवंत पाटील (सरूडकर … Read more

फोन टॅपिंग व ब्लॅकमेलिंगसाठी IPS रश्मी शुक्लांचा वापर कुणी केला? – नाना पटोले

मुंबई : पोलीस अधिकाऱ्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर करुन विरोधी पक्षाच्या लोकांवर कारवाई करण्याचे पाप देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरु झाले. वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांना हाताशी धरून राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग केले हे सिद्ध झाले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे परंतु त्यांना टॅपिंगचे कुणी आदेश दिले होते हे उघड होण्यासाठी चौकशी झाली … Read more

मुरगूडच्या श्री. व्यापारी नागरी पतसंस्थेत ” जागतिक महिला दिन ” उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड ता . कागल येथिल श्री, व्यापारी नागरी सह. पतसंस्थेत ” जागतिक माहिला दिन ‘ उत्साहात पार पडला. महिला दिन हा जागतीक स्तरावर प्रत्येक वर्षी 8 मार्च रोजी महिलांच्या सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय कामगिरीचा उत्सव म्हणून हा ” महिला दिन ” साजरा केला जातो, या महिला दिनाचे औचित्य साधून … Read more

साके येथे महिला दिन उत्सहात

व्हनाळी(सागर लोहार) : महिला दिन हा दिवस जागतिक स्तरावर दर वर्षी ८ मार्च रोजी महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या महिला दिनाचे औचित्य साधून विद्यामंदिर साके प्राथमिक शाळा व कै.सौ.सुभद्रामाता हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. प्राथमिक शाळेत सावित्रीबाईं फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सौ.विद्या पोवार यांच्या … Read more

मुरगूडमध्ये प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धेत सानिका स्पोर्टस् प्रथम तर तुकाराम चौक बारामती द्वितीय

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील सानिका FC स्पोर्टस् फौंडेशनच्या वतीने मुरगूडमध्ये प्रकाशझोतात आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात येथील सानिका स्पोर्ट्सने तुकाराम चौक बारामती संघाचा सात धावांनी पराभव करीत रोख ७५,६९९च्या रोख बक्षीसासह प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला. प्रथम क्रमांकासाठी सानिका स्पोर्टस् मुरगूड व तुकाराम चौक बारामती यांच्यात चुरशीचा सामना झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या … Read more

सर पिराजीराव शिक्षक पतपेढी राज्यात अग्रेसर: संजयबाबा घाटगे

शेंडूर येथे मोबाईल ऍप शुभारंभ व विविध पुरस्कारांचे वितरण व्हनाळी(सागर लोहार) : सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक सह पतपेढी कागल या संस्थेने शिक्षकांची पत वाढवत राज्यातील अग्रगण्य पतसंस्था असा नावलौकीक संपादन केला आहे. नेहमीच पारदर्शी काराभारास सर्वोच्च प्राधान्य देत या संस्थेने सहकारात आदर्श निर्माण केला असून वेतन आयोग लागू करणारी हि एकमेव शिक्षक पतसंस्था असल्याचे प्रतिपादन … Read more

स्त्रीमुक्ती कायद्याबरोबर मानसिकताही बदलणे गरजेचे

आज जागतिक स्तरावर अनेक प्रश्न चर्चेमध्ये आहेत, रशिया-युक्रेन युद्ध, कोरोना, जागतिकीकरण, उदारीकरण, परकीय गुंतवणूक, जागतिक मंदी असे प्रश्न नेहमी चर्चेत असतात, 8 मार्चची तारीख आली की ‘जागतिक महिला दिन’ म्हणून चार-दोन दिवसच महिलांच्या सबलीकरणाच्या विषय चर्चेत राहतो. आपल्या देशातही कोरोना. आर्थिक व्यवस्था, महागाई, पेट्रोल-डिझेलची दरवाढ, ईडी (अंमलबजावणी संचालनालय) असे प्रश्न अजेंड्यावर आहेत. चूल, मुल, भाकरी, … Read more

समान नागरी कायद्यासाठी आरक्षण संपवण्याचा भाजपाचा डाव:  नाना पटोले

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका नको   मुंबई : देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आरक्षण संपवण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव असून त्याची सुरुवात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपवण्यापासून होत आहे. परंतु ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घेऊ नयेत अशीच काँग्रेस पक्षाची तसेच महाविकास आघाडीची भूमिका आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस … Read more

error: Content is protected !!