प्रसिध्द ग्रामदैवत श्री गहिनीनाथ उरुस संपूर्ण माहिती

पुराण प्रसिध्द सिध्द पुरुष महंत नवनाथ पैकी गहिनीनाथ उर्फ गैबीपीर यांची प्राचीन पवित्र समाधी आहे. विजापूरचा बादशहा अब्दुल मुजावर इस्माईल बिन युसुफ आदिलशहा यांची कारकिर्द इ. स. 535 च्या दरम्यान कागलकरांचे पुर्वज भानाजी उर्फ तुळोजी हे उदयास आले. त्यांना कागल प्रांताचा बंडखोर देसाई बहादूरखान याचा बिमोड केल्याबद्दल कागल प्रांताची देसगत देण्यात आली. याच सुमारास तालीकोटच्या … Read more

कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने 3107 हेक्टर क्षेत्राचे नुकसान

शासनाकडून लवकरात लवकर मदत करण्यात येईल – पालकमंत्री दीपक केसरकर कोल्हापूर : अवकाळी व परतीच्या पावसाने जिल्ह्यातील 3 हजार 107 हेक्टर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या भात, सोयाबीन, भुईमुग, नाचणी, ज्वारी अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या महिनाअखेर शासनाकडे अहवाल सादर करुन शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. … Read more

मुरगूडच्या लक्ष्मीनारायण पतसंस्थेने दिपावली पाडव्याच्या दिवशी १ कोटी ७० लाख केले ठेवीचे संकलन

संस्थेच्या कर्मचारानी संस्थेने दिलेले ठेवीचे उदिष्ठ केले पुर्ण मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड व मुरगूड परिसरातील सर्वांच्या परिचयाची व विश्वासाची सुवर्णमहोत्सवी श्री . लक्ष्मीनारायण सह .पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यानीं दिपावली पाडव्याच्या एकाच दिवशी १ कोटी७० लाख एवढ्या मोठ्या ठेवीचे संकलन केले आहे. मुरगूडमधील श्री . लक्ष्मीनारायण सह .पतसंस्था ही सभासदांच्या गरजा भागवत, सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी मदत … Read more

भाऊबीज आनंदाचा क्षण – वनश्री रोपवाटीकेच्या स्तुत्य उपक्रमाने साजरा

खुदाई कामगार भगिनी ऊस तोडणी कामगार भगिनी व आरोग्य विभाग भगिनीं समवेत भाऊबीज साजरी मुरगूड (शशी दरेकर ): आरोग्य विभागाच्या भगिनी जमा झाल्या होत्या .पंचारतीने त्यांनी उपस्थितांना औक्षण केले. उपस्थित बांधवांच्या कडून त्यांना ओवाळणी म्हणून साडी आणि फराळ देणेत आला. अत्यंत भावूक असा हा भाऊबीजेचा कार्यक्रम येथील वनश्री मोफत रोपटिकेच्या कार्यस्थळावर संपन्न झाला. असाच कार्यक्रम … Read more

सामाजिकतेचे भान जपत वाढदिवस केला साजरा

मुरगूड येथील तरुणाचा आदर्शवत उपक्रम मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील युवक ओंकार पोतदार त्यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांनी ४५ खुदाई कामगार कुटुंबियांना ऐन दिवाळी सणाच्या काळामध्ये जीवनावश्यक साहित्याचे तसेच दिवाळीसाठीच्या साहित्याचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. मुरगूड येथील ओंकार पोतदार हे समाजिक कार्यात सदैव अग्रेसर असतात. कोरोना काळात तसेच महापूर काळात त्यांनी लोकांना मदत … Read more

मुरगूडच्या सानिका स्पोर्टस फौंडेशनतर्फे साडी व फराळ साहित्याचे वाटप

मुरगूड (शशी दरेकर) :येथील सानिका स्पोर्टस् फौंडेशनच्या वतीने मुरगूड शहरात धुणीभांडी करणाऱ्या व मुरगूड नगरपरिषदेत आरोग्य विभागाकडे काम करणाऱ्या महिलांना दिपावली निमित्त साडी वाटप तसेच आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांना मोती साबण, सुवासिक तेल , एक किलो पोहे, उटणे, पणती पाकीट साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवराज विद्यालयाचे माजी प्राचार्य जीवनराव साळोखे ,मुरगूड विद्यालयाचे उपप्राचार्य … Read more

विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करून इतरांना आनंद वाटा – वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी

शिवराज विद्यालयात हरित सेनेच्या वतीने फटाकेमुक्त दिवाळी अभियान मुरगूड ( शशी दरेकर ) : पर्यावरण संवर्धन भाषणातून नको तर प्रत्यक्ष कृतीतून व्हावे. विद्यार्थ्यांनी आतापासून स्वतःला पर्यावरणाचे रक्षक बनवावे. प्रत्यक्ष कृतीतून निसर्गप्रेम जोपासावे. असे प्रतिपादन वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी केले. ते शिवराज विद्यालय येथे फटाकेमुक्त दिवाळी अभियान अंतर्गत राष्ट्रीय हरित सेनेच्या वतिने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना … Read more

केडीसीसी बँकेत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ अनुदानाचे वाटप

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०१९ पहिल्या टप्प्यात एक लाख, १३ हजार शेतकऱ्यांना मिळाले ४०९ कोटी प्रोत्साहनपर लाभ अनुदान कोल्हापूर, दि.२० : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना- २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ अनुदानाच्या मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले. बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. जिल्हा बँकेशी सलग्न असलेल्या … Read more

कागलमध्ये विकासकामांसाठी रंगतोय ‘श्रेयवाद’

आगामी विधानसभेसाठी रंगीत तालीम सुरू; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

करंजीवणे(भिकाजी मसवेकर) : सध्या कागलच्या नेत्यांनी पायाला भिंगरीबांधून मतदार संघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा डेळय़ासमोर ठेऊन नेते आणि कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत. गावोगावी कार्यक्रमांची रेलचेल सुरू असून शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी चढाओढ सुरू आहे. राज्यातील सत्तातंराचाही मोठा परिणाम कागलमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांतून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. इतकेच नाही तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितासीठी इच्छुक असणारे प्रमुख कार्यकर्तेही एकमेंकाविरोधात खरपूस समाचार घेत आहेत. यानिमित्त विविध शासकीय योजना आणि विकासकांमांचे श्रेय घेण्यासाठी कागलमध्ये नेत्यांची जणू रंगीत तालीमच सुरु आहे.

आमदार मुश्रीफ-समरजित घाटगे कार्यक्रमात व्यस्त; खासदार संजय मंडलिकांची सावध भूमिका

मतदारसंघात बांधकाम कामगारांना साहित्य वाटप, पेन्शन योजना, ई-श्रम कार्ड वाटप, बैठका, मेळावे, विकासकामांचे लोकार्पण असे विविध कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात राबवले जात आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमांतून विविध योजनांचे ‘श्रेय’ पदरी पाडण्याचा प्रयत्न सुरु असून दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार आरोप करत आहेत. तर कार्यकर्तेही मोठय़ा प्रमाणात सक्रीय झाले आहेत.

आमादार मुश्रीफांच्या पाठीशी संजयबाबांचे पाठबळ

आगामी विधानसभेसाठी दोन्ही नेत्यांनी कंबर कसली आहे. यात विशेष म्हणजे माजी आमदार संजयबाबा हे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा दुरंगी होणार असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे. गत विधानसभेला झालेल्या तिरंगी लढतीचा फायदा-तोटा लक्षात घेऊनच पुढील धोरण ठरवले जात आहे. कारण गत निवडणुकीत मुश्रीफ आमदार झाले असले तरी समरजित घाटगे यांनीही दोन नंबरचे मताधिक्य मिळवले तर माजी आमदार संजयबाबा तीन नंबरवर गेले. यामुळे समरजित घाटगे यांचे मनोबाल नक्कीच उंचावले. त्यानंतर त्यांनी मोठय़ा प्रमाणात जनसंपर्क वाढवला. त्यांच्या जोडीला त्यांची पत्नी नवोदिता घाटगे यांनीही महिला मेळावे घेऊन मताधिक्य वाढवण्यावर भर दिला. राज्यातील सत्तातंरामुळे देखील समरजित घाटगे यांना मोठे पाठबळ मिळाले आहे.

दुसरीकडे आमदार हसन मुश्रीफ यांनी मतदारसंघातील विकासकामांचे उद्घाटन करताना संजयबाबांना सोबत घेतले आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्यांची उपस्थिती आहे. त्यांच्या भाषणात ते मुश्रीफांच्या विकासकामांचे तोंडभरुन कौतुक करत आहेत. सध्या सुरु असणऱया योजना आमादार मुश्रीफ यांच्यामुळेच सुरू झाल्याचे आवार्जुन सांगत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेला ते मुश्रीफांच्या पाठीशी ठाम असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यांचाही गट मोठा असल्याने ते मुश्रीफांच्या पाठीशी राहिल्यास मुश्रीफ आगामी विधानसभा लिलया पेलू शकतात ? परंतू त्यासाठी अजून दीड-दोन वर्षे बाकी आहेत. त्याचबरोबर गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ, अंबरिषसिंह घाटगे हे देखील सक्रीय झाले असून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवत आहेत.

मंडलिकांची भूमिका मात्र गुलदस्त्यात

आघाडीबरोबर असूनही गोकुळमध्ये विरेंद्र मंडलिकांचा झालेला पराभव आणि सध्या राज्यात झालेले सत्तांतर यामुळे खासदार संजय मंडलिक यांची ठोस भूमिका दिसून येत नाही. सध्या ते कोणावरही टीका-टिपण्णी करत नाहीत. शिंदे गटासोबत जाण्याचा त्यांचा निर्णय असला तरी कागलमध्ये त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतू विरेंद्र मंडलिक हे समरजित घाटगे यांच्या काही कार्यक्रमाला उपस्थिती लावतात.

2019 च्या मताधिक्यावरुन 2024 ची फिल्डिंग

2019 साली कागल विधानसभा निवडणूक तिरंगी झाली होती. यामध्ये आमदार हसन मुश्रीफ यांना 1,16,434 मते, समरजित घाटगे यांना 88,303 मते तर संजयबाब यांना 55, 657 अशी मते पडली होती. समरजित घाटगेंनी अपक्ष निवडणूक लढवत मिळवलेली मते लक्षणीय ठरली होती. त्यामुळे 2024 ची निवडणूक डोळय़ासमोर ठेवून समरजित घाटगेंनी जनसंपर्क वाढवला आहे. तर आमदार मुश्रीफ यांनी संजयबाबांना सोबत घेऊन वाटचाल सुरू केली आहे. यामध्ये खासदार संजय मंडलिक यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणारी असून मतांची गोळाबेरीज आत्तापासूनच सुरू असल्याचे चित्र सध्या कागलमध्ये दिसत आहे.

जि. प., पं. स.चे इच्छुकही सक्रीय

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी काही प्रमुख कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यांच्याकडूनही विविध उपक्रम राबवले जात आहेत. इतकेच नाही तर संधी मिळेल त्या ठिकाणी विरोधी गटावर आरोप-प्रत्यरोप करत आहेत. आपल्याच नेत्याने शासकीय योजनांसाठी कसा पाठपुरावा केला याचा दाखल जाहीर कार्यक्रमातून मतदारांना देत आहेत.

ईडीचे आरोप असलेले नेते घेऊन फिरण्यात कसला पराक्रम

सध्या महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप, आरएसएस, राज्यपाल, ईडी व सत्ता असा सामना चालला आहे. उद्धव ठाकरे पाच शत्रू बरोबर एकटे लढताना दिसतात. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस अशी युती असताना काँग्रेस व राष्ट्रवादी या चाललेल्या भांडणात काही बोलत नाहीत. सारेच मूग गिळून बसले आहेत. सत्ता तिघा पक्षांनी भोगली पण अडचणीत शिवसेना एकटी सापडली … Read more

error: Content is protected !!