जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एक राज्यस्तरीय समिती स्थापन करणार रत्नागिरी, दि. 18 : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीबाबत एक राज्यस्तरीय समिती स्थापन करून सकारात्मक पद्धतीने योग्य निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येथील चंपक मैदानावर आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महसूल, … Read more

समाज कल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा – सहायक आयुक्त विशाल लोंढे

कोल्हापूर, दि. 17 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्या अधिनस्त असणाऱ्या शासकीय वस्तीगृह, शासकीय निवासी शाळा व आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसंगांवर दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर येथे सकाळी 9 वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समाज … Read more

राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत निढोरीच्या सागर चितळेने पटकावले सुवर्ण व रौप्यपदक

४ X ४००मी. रिलेत प्रथम तर ४००मी. अडथळा शर्यतीत उपविजेतेपद मुरगूड ( शशी दरेकर ) – पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथे झालेल्या ४२ व्या राष्ट्रीय मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेमध्ये निढोरी ता. कागल येथील हौशी अँथलिट सागर बाळू चितळे या ३५ वर्षीय युवकाने ४ X ४०० मी. रिलेत प्रथम तर ४००मीटर अडथळा शर्यतीमध्ये उपविजेतेपद पटकावले. १९ … Read more

ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी सर्वसमावेशक कामकाज पार पाडावे – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर, दि. 17 : येणाऱ्या गळीत हंगामामध्ये ऊसतोड मजूर, महिला व बालके यांच्या आरोग्य तपासणीकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या वतीने पूर्वनियोजन करुन आरोग्य तपासणी करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा याकरिता ऊसतोड कामगारांची नोंदणी करुन त्यांना … Read more

लोककलासह सांस्कृतिक कार्यक्रमांची सात दिवस पर्वणी

कोल्हापूर प्रतिनिधी:- देशाच्या विविध प्रांतातील लोककला, लोकसंस्कृती यासह सात दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणीच उपस्थितांना मिळणार आहे. हजारो कलावंत यामध्ये सहभागी होणार असून रोज सायंकाळी भव्य सभामंडपात हे कार्यक्रम पहायला मिळतील. याशिवाय काही व्यासपीठावर दिवसभर देशाच्या विविध राज्यातून आलेले कलाकार आपली कला सादर करणार आहेत. कणेरी मठावर वीस ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सुमंगलम पंचभूत … Read more

जिल्ह्यातील लम्पी चर्मरोग साथ नियंत्रणात – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर, दि. 16 : जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या गो-वर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोग साथीच्या सांसर्गिक रोगामुळे आजअखेर 1 हजार 96 इतकी जनावरे मृत झाली. सद्यस्थितीत गो-वर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोग साथीने बाधित होण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य असल्याने गोवर्गीय लम्पी चर्मरोग साथ नियंत्रणात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम पशुवैद्यकीय दवाखाना चौकाक, तालुका हातकणंगले अंतर्गत असणा-या … Read more

शिक्षकांची ३० हजार पदे लवकरच भरणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिंधुदुर्गनगरी दि.16 : शिक्षकांच्या जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत कायदेशीर, आर्थिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू तसेच शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, … Read more

महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप

कोल्हापूर, दि. १६ : महाज्योती मार्फत JEE/NEET/MHT-CET साठी पात्र विद्यार्थ्यांचे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी अभिनंदन केले. संबंधित विद्यार्थ्यांनी टॅबच्या माध्यमातून नावलौकिक करावे तसेच आपली गुणवत्ता सुधारावी, असे मत श्री. लोंढे यांनी महाज्योती मार्फत आयोजित मोफत टॅब वाटप कार्यक्रमामध्ये केले. इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत व्यवस्थापकीय संचालक महात्मा … Read more

पी. एम. किसान योजनेच्या तेराव्या हप्त्याचे 27 फेब्रुवारी रोजी वितरण होणार

PM Kisan

कोल्हापूर, दि. 16 : पी. एम. किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याचे वितरण दिनांक 27 फेब्रुवारी, 2023 रोजी होणार असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे. योजनेचा लाभ केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आधार सिडींग प्रलंबित लाभार्थींची बँक खाते आयपीपीबी (इंडीयन पोस्ट पेमेंट बँक) मध्ये भारतीय डाक विभागाच्या मार्फत उघडण्यात येत आहेत. पी. एम. … Read more

मुरगूडला बीएससी नर्सिंग महाविद्यालयाची मान्यता

ग्रामीण व डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना मिळणार शासकीय आणि खाजगी सेवेत नोकरीची संधी – खासदार प्रा. संजय मंडलिक यांची माहिती मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड (ता . कागल )येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटीच्या सदाशिवराव मंडलिक इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या बी.एस.सी. नर्सिंग या चार वर्षाच्या अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने मान्यता दिल्याची माहिती संस्थेचे … Read more

error: Content is protected !!