वाचा गहिनीनाथ समाचार ऑनलाईन

E paper

गहिनीनाथ समाचार अंक 55 गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. … Read more

मुरगूडला अप्पर तहसिलदार कार्यालय मंजूर करा खास. संजय मंडलिक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता – कागल येथे अप्पर तहसिलदार कार्यालय मंजूर करावे अशी मागणी मुरगूड व परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी खास . संजय मंडलिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की मुरगूड, बिद्री, कापशी , लिंगनूर या चार मंडल कार्यालयातील लोकांना कागल येथे आपल्या शासकीय कामकाजाकरीता जावे लागते. कागल पासून मुरगूड, … Read more

मुरगूड मध्ये स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवानिमित्त वीरांना वंदन !

” चित्रकला व निबंध स्पर्धेलाही उत्स्पूर्त प्रतिसाद “ मुरगूड ( शशी दरेकर ) – भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मुरगूड नगरपालिकेच्यावतीने माझी माती माझा देश अभियान अंतर्गत शिला1 फलक अनावरण, पंच प्रण प्रतिज्ञा व वीरांना वंदन असे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. नगरपालिकेच्यावतीने येथील हुतात्मा तुकाराम चौकात स्वातंत्र्य सैनिक वारस विठ्ठल भारमल यांच्याहस्ते झेंडा वंदन करण्यात … Read more

कोतवाल पदासाठी 24 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील सजांचे कोतवाल हे पदे रिक्त असल्याने त्या पदावर कोतवाल भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी 24 ऑगस्ट 2023 पर्यंत सकाळी 9.45 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत (कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळून) तहसिलदार करवीर यांचे कार्यालय, बी. टी. कॉलेज, शाहुपूरी कोल्हापूर येथे स्वत: अर्ज सादर करावेत, असे आवाहन करवीर तहसिलदार स्वप्नील रावडे यांनी केले … Read more

मुरगूडच्या सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात डॉ. एसआर रंगनाथन यांची जयंती साजरी

मुरगूड ( शशी दरेकर ) – सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड अंतर्गत महात्मा फुले ग्रंथालयामध्ये आज दि. ९ ऑगस्ट रोजी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीस उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. टी.एच. सातपुते यांनी केले. त्यांनी डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या ग्रंथालय शास्त्राच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. … Read more

मेरी मिठ्ठी मेरा देश अंतर्गत मुरगूड नगरपरिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुरगुड ( शशी दरेकर ) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता समारोप अंतर्गत “मेरी मिठ्ठी ,मेरा देश” अर्थात “माझी माती, माझा देश “ या अभियाना अंतर्गत मुरगूड नगर परिषदेमार्फत दिनांक ११/०८/२०२३ रोजी हु.तुकाराम भारमल चौक येथे सकाळी ८.४५ वा. शिलाफलक अनावरण, सकाळी ९.०० वा. ध्वजारोहण कार्यक्रम आणि विश्वनाथराव पाटील खुले सभागृह या ठिकाणी सकाळी ९.१५ … Read more

वंदूर येथील ग्रामदैवत श्री. हनुमान मंदिरामध्ये चोरी

सुमारे 6 लाख 60 रुपयांची चोरी कागल ( विक्रांत कोरे ) : वंदूर ता. कागल येथील ग्रामदैवत श्री. हनुमान मंदिर मध्ये दहा किलो चांदी चा प्रभावळ व एक किलो चांदीचा मुकुट असे सुमारे सहा लाख साठ हजार रुपयांची चोरी झाली आहे. मूर्तीस चोरट्यांनी कोणत्याही प्रकारचा धका लावलेला नाही. ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर हे गावाच्या मध्यवर्ती … Read more

मुरगूड येथील श्री व्यापारी नागरी सह पतसंस्थेची वार्षिक सभा रविवारी १३ ऑगष्ट रोजी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल बाजारपेठ येथिल रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करणारी विश्वसनिय श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ( फक्त सभासदा करीता ) रविवार दि. १३ ऑगष्ट रोजी दुपारी ठिक १ वाजता श्री. लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात भरविण्यात येणार आहे. सर्व सभासद बंधू -भागिनीनीं वेळेवर … Read more

मुरगूड येथील हुतात्मा तुकाराम भारमल वाचनालयात क्रांती दिन साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील हुतात्मा तुकाराम भारमल वाचनालयामध्ये क्रांती दिन साजरा करण्यात आला. प्रथम क्रांतीकारांच्या प्रतिमेचे पूजन श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन श्री किरण गवाणकर व संतोष खराडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यानंतर दोन मिनिटे स्तब्धता पाळून क्रांतीकारानां श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे सचिव एस व्ही … Read more

शेंडा पार्क येथील ११०० खाटा रुग्णालयाऐवजी ६०० घाटांचे सामान्य रुग्णालय व २५० खटांचे कॅन्सर रुग्णालय

वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुंबई, दि. ९ : कोल्हापूरच्या शेंडा पार्क येथील ११०० खाटा रुग्णालयाऐवजी ६०० खाटांचे सामान्य रुग्णालय व २५० खाटांचे कॅन्सर रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व … Read more

error: Content is protected !!