वंदूर मध्ये मुलाने केला आईचा निर्घृण खून

कागल / प्रतिनिधी : दारूच्या आहारी गेलेल्या लेकाने दारुला पैसै देण्यास आईने नकार दिला.नशेत लेकाने आईचा गळा घोटला. ही घटना कागल तालुक्यातील वंदूर येथील वांईंगडे मळ्यात बुधवारी रात्री उशिरा घडली.संशयीत आरोपी निलेश अशोक वांईंगडे वय वर्ष 30 यास कागल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रीमती सुनिता अशोक वांईंगडे वय वर्ष 51 राहणार वंदूर वाईंगडे मळा असे … Read more

निवृत्ती वेतनधारकांनी हयातीचा पुरावा सादर करावा – जिल्हा कोषागार अधिकारी नराजे

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) :  निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या बँकेतील हयातीच्या दाखल्यांच्या यादीतील नावासमोर स्वाक्षरी करणे अथवा हयातीचा पुरावा सादर करणे  आवश्यक असल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी अ.अ.नराजे यांनी कळविले आहे.        या अनुषंगाने निवृत्तीवेतनधारकांनी दिनांक १  नाव्हेंबर २०२३ रोजी हयात असल्याबाबत निवृत्तीवेतन घेत असलेल्या बँकेतील यादीत आपल्या नावासमोर स्वाक्षरी करावी. तसेच या यादीत आपले पॅन कार्ड, आधार कार्ड व मोबाईल क्रमांक बरोबर असल्याची खात्री करावी. शिवाय निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी पुनःश्च शासनामध्ये … Read more

शालांत पूर्व दिव्यांग शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा

कोल्हापूर (जिमाका) : राज्य शासनाच्या वतीने इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत पूर्व दिव्यांग शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. सन २३-२४ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज त्या त्या तालुक्यामध्ये शाळा प्रमुखांमार्फत तालुका निहाय आयोजित केलेल्या कॅम्पच्या ठिकाणी दिनांक २९ व ३० नोव्हेंबर २०२३ … Read more

मुरगूड मध्ये घरफोडी ५ तोळ्याच्या सोन्याच्या दागीन्यासह तीन लाखाची चोरी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल गाव भागातील रावण गल्लीमध्ये रहात असलेल्या पांडुरंग गणपती डेळेकर यांच्या बंद घराचा दरवाजाचा कडी कोंयडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख किंमतीचे पाच तोळ्याचे सोन्याचे दागीने लंपास केले . या घटनेची मुरगूड पोलिसात नोंद झाली आहे. या घटने संबधी अधिक माहिती अशी : पांडुरंग डेळेकर हे आपल्या पत्नीसह … Read more

मुरगूड येथे मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषणास प्रारंभ

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथील सकल मराठा समाज आणि नागरिकांच्या वतीने शिवतीर्थ मुरगुड येथे बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली. सकाळी ग्रामदैवत अंबाबाई मातेस पुष्पहार घालून अंबाबाई मंदिरापासून तुकाराम चौक येथील हुतात्मा तुकाराम भारमल यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून रॅली उपोषणा ठिकाणी आली. यानंतर साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मराठा आरक्षणाचे … Read more

मुरगूडमध्ये ज्वेलरीच्या दुकानात कैरोटोमीटरचे उदघाटन

चोख सोन्याची वर्गीकरणासह पडताळणी मुरगूड (शशी दरेकर) : कागल, राधानगरी व भुदरगड या तीन तालुक्यांना मध्यवर्ती असणाऱ्या मुरगूड बाजारपेठेतील सिध्दीविनायक ज्वेलर्समध्ये सोन्याची चोख परीक्षण करुन त्याचे वर्गीकरणासह विवरण करणाऱ्या मशिनचे उदघाटन आज समारंभपूर्वक करण्यात आले. पंचक्रोशीतील खेडोपाड्यातील ग्रामीण शेतकरीवर्गातील अबालवृध्द लहान थोर बंधु भगिनीच्या सदैव भरगच्च असणाऱ्या मुरगूडच्या बाजारपेठेत आपल्या दागिनेच ओळखून त्यातील शंका निरसन … Read more

मुरगूडमध्ये राजकीय सभांना बंदी सकल मराठा समाज मुरगूडच्या बैठकीत निर्णय

30 ऑक्टोंबर पासून बेमुदत साखळी उपोषणाचा निर्धार मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड शहरांमध्ये जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय सभांना बंदी घालण्याचा तसेच 30 ऑक्टोबर पासून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा निर्धार येथील झालेल्या सकल मराठा समाज आणि मुरगुड शहर नागरिकांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राजकीय नेत्यांनी वेळोवेळी सोयीस्कर भूमिका घेतली आहे. … Read more

दूधसाखर महाविद्यालयची प्राची चौगले पदवी परीक्षेत मराठी विषयात विद्यापीठात प्रथम

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील दूधसाखर महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्राची बंडेराव चौगले ही शिवाजी विद्यापीठाच्यावतीने मार्च/एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या पदवी परीक्षेत मराठी विषयामध्ये विद्यापीठात गुणानुक्रमे प्रथम आली. दूधसाखर शिक्षण प्रसारक मंडळाचे व श्री इधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून तिला गौरविण्यात आले. विद्यापीठाच्या वतीने … Read more

नैसर्गिक शेती काळाची गरज: प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

कोल्हापूर : सद्यस्थितीमध्ये वातावरणात होत असलेल्या बदलांचा परिणाम व शेती पद्धतीमध्ये अडचणी वाढत चाललेला खर्च याचा ताळेबंद बसत नसल्यामुळे नैसर्गिक शेतीकडे वळण्याची गरज आहे असे मत भा.कृ.अनु.प. – श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी असे व्यक्त केले. श्री सिद्धगिरी मठ व भा.कृ.अनु.प. – श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी यांच्या … Read more

शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी इच्छुक स्वयंसेवी संस्थांची 3 नोव्हेंबरला बैठक

कोल्हापूर (जिमाका) : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि भारतीय विदेश सेवेचे माजी वरिष्ठ अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या वतीने ‘चांगुलपणाची चळवळ’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात शासनाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक संवेदनशीलपणे करण्यासाठी तसेच या योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्ह्यात सामाजिक विषयांवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था (एनजीओ), व्यक्ती यांच्या … Read more

error: Content is protected !!