वाघापूरात नागपंचमी उत्सवाची जय्यत तयारी

प्रति वर्षि प्रमाणे याही वर्षी पहाटेपासून धार्मिक विधी पार पडणार मडिलगे (जोतीराम पोवार) : महाराष्ट्र कर्नाटक व गोवा राज्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघापूर तालुका भुदरगड येथील श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग देवाची नागपंचमी यात्रा दिनांक 9 ऑगस्ट 2024  रोजी संपन्न होत आहे यावेळी भाविकांच्या सर्व सोयी सुविधा सह यात्रेची जय्यत तयारी पूर्ण झाली असल्याचे देवस्थान समितीचे … Read more

पालकमंत्री मुश्रीफ यांनी सी. पी. आर. ला सर्व सोयीसुविधा दिल्या – वसंतराव मुळीक

एम. आर. आय. मशीनबद्दल सीपीआर बचाव कृती समितीच्यावतीने सत्कार आरोग्य सुविधांसाठी वर्षभरात आणला १, २७५ कोटींचा निधी कोल्हापूर, दि. ५: पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाला सर्व अत्याधुनिक आणि दर्जेदार सोयीसुविधा दिल्या, असे गौरवोद्गार काढले. ते स्वतः आरोग्यदूत असल्यामुळेच गोरगरीब रुग्णांविषयी त्यांना कळवळा आहे, असेही ते म्हणाले.               कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून … Read more

तामगावात युवकाची आत्महत्या

कोल्हापूर : तामगाव (ता. करवीर) येथील कॉलेज युवकाने संकेत राहत्या घरात लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संकेत संजय कदम (वय २०) असे त्याचे नाव आहे. हा एकुलत्या मुलगा होता. मुलाने आत्महत्याची बातमी ऐकून आई, वडिलांनी केलेला आक्रोश मन लागणारा होता. आत्महत्येचे कारण समजले नाही. कदम कुटुंबीय मूळचे कापशी (ता. शाहूवाडी) येथील. रविवारी सकाळी … Read more

माजी खास. संजय मंडलिक समरजीत घाटगे मुरगूड येथे आज एकाच व्यासपीठावर

राजकीय भूमिकेकडे सर्वांच्या नजरा मुरगूड (शशी दरेकर ) : सानिका स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने मुरगुड ता.कागल येथे स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या 76 व्या जयंतीनिमित्त शालेय शैक्षणिक साहित्य वाटप सोमवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी चांदेकर हॉल मुरगूड येथे होत आहे.माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या हस्ते साहित्य वितरण होत असून शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे प्रमुख … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ५० ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ५० दिनांक ०५-०८-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया … Read more

महान विभूतींचे विचार कृतीतून व्यक्त होण्याची गरज – प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांचे कार्य आणि विचार कृतीतून व्यक्त होण्याची गरज असल्याचे मत पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा चे प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी व्यक्त केले. ते महाविद्यालयात कला विभागामार्फत आयोजित केलेल्या अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते. ते … Read more

मुरगूडात अप्पर तहसिलदार कार्यालय सुरु करावे : माजी नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूडमध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय व्हावे या मागणीचे निवेदन माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी नगरसेवक एस. व्ही. चौगले, आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना प्रत्यक्ष भेटून दिले.               मुरगूड हे कागल तालुक्यातील पश्चिम भागातील प्रमुख बाजारपेठ असलेले शहर असून मुरगूड पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात ५७ गांवे येतात. त्याच बरोबर या ठिकाणी … Read more

मुरगूडमध्ये ज्येष्ठ नागरिक संघात लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे जयंती साजरी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे होते.            संघाचे सचिव सखाराम सावर्डेकर यांनी स्वागत केले . लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन संघाच्या सदस्या सौ .उषादेवी सातवेकर यांच्याहस्ते झाले तर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन … Read more

सिध्दनेर्ली मार्गे कागल – मुरगुड वाहतूक बंद

सिध्दनेर्ली- नदीकिनारा येथे पुलावर पाणी कागल/प्रतिनिधी : सिध्दनेर्ली- नदीकिनारा येथे पाणी आल्याने कागल – मुरगुड वाहतूक बंद करण्यात आली आहे.तसेच एकोंडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.         गेली आठवडाभर झाले पावसाने चांगलेच बस्तान बसविले आहे. त्यामुळे नद्यांना नाल्यांना पाणीच पाणी आले आहे. कागल ऊन मुरगूड कडे जाणाऱ्या रस्त्यावर सिद्धनेर्ली … Read more

मुरगूडच्या नवमहाराष्ट्र मंडळातर्फे म्हामद्याचा कार्यक्रम

दोनशे भाविकांना महाप्रसाद वाटप मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड-येथील  विविध समाजोपयोगी उपक्रम  राबवणा-या नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळातर्फे, आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ असलेल्या, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोहळ्यात  दिवेघाट ते सासवड पायीचालत श्रद्धाभावपूर्वकपणे सामील  होऊन परतलेल्या नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील दोनशे भाविक, भक्तांना म्हामद्याचा(महाप्रसाद वाटपाचा) कार्यक्रम केला. गेली पंधरा वर्षांपासून हा उपक्रम मंडळातर्फे अतिशय पवित्र  … Read more

error: Content is protected !!