मुरगूड ( शशी दरेकर ) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांचे कार्य आणि विचार कृतीतून व्यक्त होण्याची गरज असल्याचे मत पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा चे प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी व्यक्त केले. ते महाविद्यालयात कला विभागामार्फत आयोजित केलेल्या अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, “अण्णाभाऊ साठे यांनी केवळ अत्यल्पशिक्षित असतानाही लेखनामार्फत त्या काळातील समाजाचे विदारक सत्य समोर आणले. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, कामगार चळवळ आणि साहित्य चळवळ यामध्ये सक्रिय योगदान दिले. लोकमान्य टिळक यांनी जाज्वल्य राष्ट्रवादी विचारधारेने प्रेरित होऊन सर्वांना स्वराज्याचा मूलमंत्र दिला. दुर्दम्य इच्छाशक्ती व अढळ धैर्याच्या बळावर त्यांनी स्वराज्याची आक्रमक मांडणी केल्यामुळे ते राष्ट्रजनक बनले. चतुसूत्री कार्यक्रमाबरोबरच त्यांना ‘कायदेशीर बंडाचे प्रवक्ते’ असे म्हटले जाते.
यावेळी प्रा. डॉ. संदीप पानारी यांनीही मनोगत व्यक्त केले. संस्थेचे चेअरमन प्रा. सतीश देसाई व सचिव प्रा. डॉ. विद्या देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. ए. एस. कांबळे आणि प्रा. राहुल कांबळे यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. संतोष भोसले यांनी, आभार प्रा. हुसेन फरास व सूत्रसंचलन प्रा. ऐश्वर्या धामोडकर यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Its like you read my mind You appear to know so much about this like you wrote the book in it or something I think that you can do with a few pics to drive the message home a little bit but instead of that this is excellent blog A fantastic read Ill certainly be back