फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर जबरदस्तीने चौघांकडून शारीरिक अत्याचार, मुरगूड पोलिसांत गुन्हा

मुरगूड (शशी दरेकर) : ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने तरुणीला बोलावून तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Advertisements

या प्रकरणी मुरगूड पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची मुख्य आरोपी
आदित्य बाजीराव शेटके  वय २४ (रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी) याच्याशी ओळख झाली होती.

Advertisements

ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीला मुदाळ तिट्टा येथे बोलावून घेतले व नंतर मुरगूड येथील तलाव परिसरातील झाडीमध्ये नेले. तेथे तिचे फोटो काढून ते एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. बदनामीची भीती दाखवत त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

त्यानंतर आरोपीने तरुणीची ओळख रणजित संभाजी मुधोळकर वय२९ (रा. सोळांकुर, ता. राधानगरी) याच्याशी करून दिली. फिर्यादीनुसार, रणजितने तरुणीला गिरगाव, कात्यायनी, सीबीएस कोल्हापूर तसेच पाचगाव परिसरातील विविध लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यावेळी तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली गेली.

यानंतर आरोपींनी तरुणीची ओळख प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर  वय२४(रा. राधानगरी) याच्याशी करून दिली. त्याने तरुणीला स्नॅपचॅटवर बोलण्यास भाग पाडले व स्वतःच्या कारमधून घेऊन जाऊन एका लॉजमध्ये तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
तसेच विक्रम रामचंद्र पाटील वय २२ (रा. बुजवडे, ता. राधानगरी) याच्याशीही ओळख वाढवून देण्यात आली. त्याने पाचगाव येथील अशोकाराज लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीनुसार, मुरगूड येथील तलाव परिसर, गिरगाव, कात्यायनी, सीबीएस कोल्हापूर परिसरातील लॉज, अशोकाराज लॉज व टॉप हिल लॉज येथे वेळोवेळी पीडितेवर अत्याचार करण्यात आले. तसेच प्रकरण मिटवून देण्यासाठी आरोपींकडून पैशांची मागणी करण्यात आली होती. पैसे दिल्यानंतरही मोबाईलमधील फोटो व व्हिडिओ डिलीट केले जाणार नसल्याची धमकी देऊन पीडितेचा मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

गेल्या सहा ते सात महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अखेर हा त्रास असह्य झाल्यानंतर पीडितेने मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पीडितेच्या फिर्यादीवरून मुरगूड पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील करीत आहेत.

दरम्यान, या गंभीर प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी मुरगूड पोलिस ठाण्याला भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली

या प्रकरणाचा पुढील तपास मुरगूड पोलिसांकडून सुरू आहे. ६ जुन पर्यंत पी सी दिलेली आहे

तथापि आरोपी प्रणावगिरी याची आई प्राध्यापिका ऐश्वर्या पालकर या. शिक्षण क्षेत्रामध्ये तसेच महिला दक्षता समिती मध्ये असून त्यांचा मुलगा अशा प्रकारामध्ये असल्यानंतर त्या विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार अशी संतप्त प्रतिक्रिया राधानगरीमध्ये उमटत आहे त्याचबरोबर हे प्रकरण  मिटवण्यासाठी आरोपींकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा देखील परिसरामध्ये होती

Leave a Comment

error: Content is protected !!