माजी खास. संजय मंडलिक समरजीत घाटगे मुरगूड येथे आज एकाच व्यासपीठावर

राजकीय भूमिकेकडे सर्वांच्या नजरा

मुरगूड (शशी दरेकर ) : सानिका स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने मुरगुड ता.कागल येथे स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या 76 व्या जयंतीनिमित्त शालेय शैक्षणिक साहित्य वाटप सोमवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी चांदेकर हॉल मुरगूड येथे होत आहे.माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या हस्ते साहित्य वितरण होत असून शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे प्रमुख उपस्थितीत व  गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे .

Advertisements

     लोकसभा निवडणुकीतील प्रा. मंडलिक यांच्या पराभवाच्यातुन राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. मंडलिक आणि पालक मंत्री मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांच्यात सोशल मीडिया वॉर पेटले होते.यावर सावध प्रतिक्रिया देताना प्रा. मंडलिक यांनी “पराभवास कोणास जबाबदार धरू नये. तालुक्यात मंडलिक गटाला वजा करून राजकारण करता येत नाही” असे वक्तव्य केले होते. या राजकीय पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवार समरजीतसिंह आणि लोकसभेतील महायुतीचे उमेदवार प्रा. मंडलिक हे एका व्यासपीठावर येत आहेत.

Advertisements

विधानसभा निवडणकीत संभाव्य उमेदवार कोणत्या पक्षाच्या तिकिटावर लढणार याबाबत अद्याप “झाकली मूठ” अशी स्थिती आहे.कार्यक्रमात प्रा.संजय मंडलिक आणि समरजीतसिंह घाटगे कोणती राजकीय भूमिका व्यक्त करतील का ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Advertisements

लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर प्रा.संजय मंडलिक यांनी मोजक्याच सार्वजनिक कार्यक्रमास उपस्थिती लावली आहे.आज होणाऱ्या कार्यक्रमात मंडलिक आणि राजे घाटगे गटाच्या भूमिका स्पष्ट करणारा ठरेल का याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. या कार्यक्रमासाठी बिद्रीचे माजी व्हाईस चेअरमन बाबासाहेब पाटील मुरगुड चे माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके ,राजेखान जमादार आजी माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत‌, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस दगडू शेणवी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

1 thought on “माजी खास. संजय मंडलिक समरजीत घाटगे मुरगूड येथे आज एकाच व्यासपीठावर”

Leave a Comment

error: Content is protected !!