निढोरीत मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

राजे बँक व राजे फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम

मुरगुड ( शशी दरेकर ) : राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँक व राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन, कागल यांच्या संयुक्त विद्यमाने भैरवनाथ मंदिर, निढोरी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

Advertisements

         शिबिराचे उद्घाटन राजे बँकेचे अध्यक्ष नवोदिता घाटगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या शिबिरात १६० हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली.

Advertisements

   दिलीप पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. तसेच गाव नकाशाच्या बोर्डाचे अनावरण नवोदिता घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात नवोदिता घाटगे यांनी कागल तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून सातत्याने आरोग्य शिबिरे घेतली जात असल्याचे सांगितले. महिलांनी स्वतःसह कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून घ्यावी,असे आवाहन सुवर्णा पाटील यांनी केले.

Advertisements

      शिबिरात आकाशदीप हॉस्पिटल, आयुष हॉस्पिटल, संकल्पसिद्धी हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव यांनी सहभाग घेतला.

    यावेळी दिगंबर अस्वले,जयश्री नाईक, आशा पाटील, शामल पाटील, भारती पाटील, वैभव कळमकर, शशिकांत पाटील, रणजित पाटील, प्रकाश पाटील, अमर चौगले,मारुती पाटील, बाजीराव मगदूम , लक्ष्मण जत्राटे,अरुण पाटील यांच्यासह ग्रामस्थ, राजे बँक व शाहू कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.योगीनी कळमकर यांनी स्वागत केले, तर दत्तामामा खराडे  यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Comment

error: Content is protected !!