कागल (प्रतिनिधी) : कागल येथील श्री छ. शाहू सहकारी साखर कारखाना लि. कागलने गत हंगाम २०२५-२६ मधील गाळपास आलेल्या ऊसास प्रतिटन रु.१००/- प्रमाणे बील ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करीत आहोत.अशी माहीती कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी दिली.
यावेळी शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, फायनान्स मॅनेजर आर. एस. पाटील आदी उपस्थित होते.

शाहू कारखान्याने गत हंगामात ८ लाख ४४ हजार ९८७ मे. टन इतके ऊस गाळप केले आहे. सन २०२५-२६ चा हंगाम सुरू होण्यापूवी गळीतास येणा-या ऊसास पहिली उचल प्रतिटन रु. ३४००/- प्रमाणे व हंगाम समाप्तीनंतर रु.१००/- असे एकूण प्रती टन रु.३५००/- देण्याचे जाहीर केले होते.त्यानुसार ३४००/- प्रमाणे यापुर्वी ऊस बिले वर्ग केली आहेत.
श्री गणेश चतुर्थी, दसरा व दिवाळी सणासाठी आणि शेतीच्या मशागतीसाठी ऊस उत्पादकांना ही रक्कम उपलब्ध व्हावी या हेतूने संबधीत शेतक-यांच्या बँकेतील खातेवर आता उर्वरित प्रतीटन रु १००/- प्रमाणे वर्ग करीत आहोत. तरी शेतक-यांनी आपल्या संबधीत बँकेशी गुरुवार दि.१० सप्टेंबरपासून संर्पक साधावा असे आवाहन व्यवस्थापनाच्यावतीने करण्यात आले.
यावेळी श्रीमती घाटगे म्हणाल्या, कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्यापासून शााहू कारखान्याने नेहमीच गुणवत्तेनुसार निघणारा दर व सातत्याने एफ.आर.पी पेक्षाही जादा दर देण्याची परंपरा जपली आहे.यापुढेही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊस दर देण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत.शेतक-यानी पिकवलेल्या ऊसाला चागंला दर मिळाला पाहिजे ही नेहमीच शाहूची भुमिका राहिली आहे.
कारखाना व्यवस्थापनाने गळीत हंगाम२०२६-२७ साठी निश्चित केलेले गळीताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतक-यांनी पिकविलेला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवावा, असे आवाहन व्यवस्थापनामार्फत करण्यात आले.
टीप सदर बातमीत अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांचा फोटो वापरावा. तसेच सदरची बातमी कोल्हापूर व बेळगाव आवृतीसाठी घ्यावी हि विनंती.