मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघात डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती साजरी व अभियंता दिन साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ):-

          येथील ज्येष्ठ नागरिक संघात डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती व अभियंता दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभियंता शाहू फर्नांडिस  होते.
          
      यावेळी डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन शाहू फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाहू फर्नांडिस ,पी जी चौगले, श्रीपतराव खराडे, जयकुमार गुजर, संभाजी आंगज, सुधीर गुजर, बाळासो सुर्यवंशी, प्रकाश पोतदार, ईस्माईल नायकवडी, सदाशिव एकल, महादेव वागवेकर या अभियंत्यांचे गुलाब पुष्प पेढा भरवून स्वागत करण्यात आले.

            यावेळी अभियंता प्रा.संभाजीराव आंगज यांनी डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या कारकिर्दीतील अनेक यशस्वी घटनांना उजाळा दिला.

यावेळी अभियंता शाहू फर्नांडिस, पी जी चौगले, श्रीपतराव खराडे, जयकुमार गुजर, मनोज सासणे यांनीही अनेक उदाहरणे देत डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभिवादन केले.
             

Advertisements

  कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष पी डी मगदूम, सचिव सखाराम सावर्डेकर, खजिनदार शिवाजी सातवेकर, अशोक डवरी, एम टी सामंत, प्रा.चंद्रकांत जाधव यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक, सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमात अभियंता सदाशिवराव एकल यांनी स्वागत केले. प्रास्ताविक जयवंत हावळ यांनी केले. तर आभार महादेव कानकेकर (सर ) यांनी मानले.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!