सोमवारपासून कागल – मुरगूड -आदमापूर – मालवण बससेवेचा प्रारंभ

मुरगूड (शशी दरेकर) : कागलहून मुरगूड -आदमापूर – मालवण ही बससेवा सोमवार दि .२२ जूनपासून सुरु करण्यात येत असल्याची माहिती एस् टीचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यानीं दिली. या नव्याने सुरू होणाऱ्या बससेवेमुळे कागल – मुरगूड परिसरातील कोकणात जाण्यासाठी प्रवाशांच्यासाठी पर्वणी ठरणार आहे.

Advertisements

ही बससेवा दररोज सकाळी कागलहून ६ वाजता सुटणार असून सावर्डे -मुरगूड -आदमापूर -मुदाळ तिट्टा -राधानगरी -फोंडा – कणकवली -कसाल- मालवण या मार्गावर ही बस धावणार आहे. मालवणहून पुन्हा ही बस १ वाजता पुन्हा याच मार्गाने परतीचा प्रवास करणार आहे.

Advertisements

कोकणातील प्रवाशांसाठी श्रीक्षेत्र आदमापूर येथिल सद्गुरू बाळूमामांच्या दर्शनासाठी व कागल – मुरगूड परिसरातील प्रवाशानां थेट कोकणात जाण्यासाठी या बससेवेचा उपयोग होणार आहे. तसेच ही बस मुरगूडहून कागलकडे पाच वाजता जाणार असल्याने शालेय विद्यार्थ्यांची घरी जाण्याची सोय होणार आहे. या नव्याने सुरू होणाऱ्या बससेवेमुळे प्रवाशामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!