मुरगूड ( शशी दरेकर ) : हसूर खुर्द तालूका कागल येथील विवाहितेने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी दहाचे दरम्यान घडली. घटनेची नोंद मुरगूड पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी विक्रम कृष्णा मस्कर ( ३६) हे मिस्त्री आहेत . पत्नी सौ जानकी विक्रम मस्कर(२९) सह हे संभाजी दतू मसकर यांच्या घरी भाड्याने राहतात . मंगळवारी सकाळी दहा ते एकचे दरम्यान या भाड्याच्या घराच्या आतील बाजूच्या खोलीत तुळईला ओढणीने गळपास घेऊन जानकीने आत्महत्या केली . घटनेची वर्दी जानकीचे पती विक्रम मसकर यांनी पोलीसात दिली. मुरगूड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
I like this site very much, Its a real nice office to read and obtain info.?