कागल येथे गणेश मंडळांच्या बैठकीच्या वेळेत बदल; आता गुरुवारी सायंकाळी ४ वाजता आयोजन

कागल (प्रतिनिधी): आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कागल शहर व कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांची आयोजित करण्यात आलेली बैठक आता नियोजित वेळे ऐवजी गुरुवारी, ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता होणार आहे.

Advertisements

ही बैठक पूर्व नियोजनानुसार गुरुवारी सकाळी १०:०० वाजता कागल कोर्टाजवळील बहुउद्देशीय हॉल येथे होणार होती. मात्र, गुरुवारी सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर येथे पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक असल्याने कागल येथील बैठकीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

Advertisements

या बैठकीस खालील प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत: उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर विभाग, उपविभागीय अधिकारी, कागल-राधानगरी, तहसीलदार, कागल, मुख्याधिकारी, कागल नगरपालिका, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष, कागल, कागल शहरातील तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावा गावांतील गणेश मंडळांचे पदाधिकारी, अध्यक्ष व सदस्यांनी गुरुवारी सायंकाळी ठीक ४.०० वाजता बहुउद्देशीय हॉल, कागल येथे वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!