२ वाहनासंह १४ बैल ताब्यात
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील आठवडा बाजारातून कर्नाटकात बेकायदेशीररित्या जनावारांची वहातूक करताना सोनगे ता.कागल येथे पकडण्यात आली. दोन वाहनातून १४ बैल घेवून जात होते. याबाबतची फिर्याद मानद प्राणी कल्याणाधिकारी अंकूश गोडसे यांनी मुरगूड पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मंगळवारी मुरगूड चा आठवडी बाजार होता. या बाजारातून जनावारांची बेकायदेशिर वाहतूक कर्नाटकात होणार असल्याबाबतची माहीती मिळाली त्यानुसार मुरगूड पोलीसांनी मुरगूड निपाणी मार्गावरील सोनगे ता.कागल येथे आयशर ट्रक के.ए. २५ सी. २५३० मध्ये पांढऱ्या रंगाची ८ बैले तसेच टाटा टेंम्पो ४०७ क्र, के. ए. ३०-६७५८ मध्ये ६ बैले होती. दोन्ही वाहनामध्ये हे १४ बैल दाटीवाटीने भरुन, चारा पाण्याची सोय न करताना जनावारे वाहतूक करण्याचा परवाना नसताना ही वाहतूक केली जात होती.
ही मुरगूड पोलीसांनी पकडली असून २ लाख ५० हजाराची दोन वाहने आणि २ लाख ८० हजाराची १४ बैल पकडली आहेत. मानद प्राणी कल्याण अधिकारी अंकूश पांडूरंग गोडसे यांनी मुरगूड पोलीसात फिर्याद दिली असून त्यानुसार विकास सदाशिव आमते ( रा. खजगौडनट्टी ता. चिकोडी), लगमान्ना बाळाप्पा बाडकर (रा. वड्राळ ता. चिकोडी) यांच्यावर पशुक्रूरताच्या कलमानुसार मुरगूड पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पो.हे. कॉ. एस. बी. पारखे करीत आहेत.