मुरगूड ( शशी दरेकर )
मुरगूड ता . कागल येथिल मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघात राजर्षि शाहू महाराज जयंतीनिमित्य अभिवादन करण्यात आले . यावेळी राजर्षि शाहू यांच्या प्रतिमेचे पूजन मारुती हरी रावण यांच्या हस्ते करून घोषणा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संघाचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते सिकंदर जमादार ( पापा ) हे होते.
यावेळी प्रमुख व्याख्याते प्रा. किशोर पाटील यानीं आपल्या व्याख्यानातून शाहुंचे महान कार्य लोकांच्या समोर मांडले. शाहूनी केलेल्या कार्यात प्राथमिक मोफत, लक्ष्मी तलाव बांधकाम, उत्पादित शेतमालासाठी शाहूपुरी बाजारपेठ वसवली , कला -क्रिडाना प्रोत्साहन , तालीम व नाट्यगृह , कोल्हापूर गुळ व शेती उत्पादन व्यापार वृध्दीसाठी रेल्वे आणली , जातीनिहाय हायस्कूल व उच्च शिक्षणासाठी वसतीगृह , अस्पृशता निवारणासाठी गंगाराम कांबळे यानां हॉटेल काढून दिले , होळकरांच्या घरी जातीबाहेर विवाह संबध स्थापन करुन समता स्थापन केली , १९०२ साली भारतात प्रथम राजर्षि शाहूनीं दलितासाठी ५० टक्के आरक्षण कायदा केला , बहुजनासाठी क्षात्र जगत गुरु पदाची स्थापना केली . अशा अनेक गोष्टींचा व त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा सारांश उलगडला.
यावेळी संघाचे अध्यक्ष गजानन गंगापूरे , उपाध्यक्ष पी .डी. मगदूम , आर .डी. चौगले , विनायक हावळ , सदाशिव यादव, महादेव वागवेकर , पी .आर. पाटील , सखाराम सावर्डेकर, तुकाराम भारमल , सुरेश दरेकर , प्रा . चंद्रकांत जाधव यांच्यासह सभासद , नागरीक उपस्थित होते .
स्वागत संचालक जयवंत हावळ यानीं केले तर आभार एम .टी. सामंत यानीं मानले.