
कागल (सलीम शेख) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने, एडवोकेट आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराणी ताराराणींची ३५०वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील पाच तालुक्यांत फिरवण्यात आलेल्या भव्य चित्ररथाद्वारे ताराराणींचे जीवन आणि योगदान जनजागृती करण्यात आले. चित्ररथ हा ताराराणींच्या गडाची हुबेहूब नक्कल करून तयार करण्यात आला आहे.

रथाला ताराराणींचे अश्वारूढ आणि बैठक पुतळे जोडण्यात आले आहेत. रथाच्या चारही बाजूंनी ताराराणींच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगांचे चित्रण करण्यात आले आहे. यामुळे त्यांचे जीवनचरित्र पुरेपूर माहिती मिळाली. कलाकारांनी ताराराणींच्या जीवनावर आधारित पोवाडे सादर करून रथाचे सौंदर्य वाढवले.

चित्ररथाचे निर्माते आरडिरेक्टर: सुमित पाटील,संयोजन- अभिजीत जोशी, आदीत्य बिलवलकर, क्रिएटिव्ह डिरेक्टर- मंगेश जगनाथ खरात,आर्ट- सुमित पाटील, प्रोडक्शन हेड- दीपक खटावकर, युवराज ओतारी, मयुर देसाई. हा भव्य चित्ररथ आता मुंबई येथील २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. महाराणी ताराराणींच्या या भव्य चित्ररथाद्वारे त्यांचे ऐतिहासिक योगदान पुन्हा एकदा सर्वांसमोर आणण्यात आले आहे.