
अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्याचा मुरगूड नागरिकांचा इशारा
मुरगूड (शशी दरेकर) : सध्या मुरगुड नगरपालिकेतर्फे घरफळा आणि पाणीपट्टी वरती व्याज वसुली करण्याच्या नोटिसा देण्यात येत आहेत घरफळा भरण्याची अंतिम तारीख ३१ मार्च असून त्याच्या आधीच नागरिकांना या नोटीसा देऊन वसुली सुरू केली आहे . त्यावरती व्याज का द्या नागरिकांनी नगरपालिकेकडे कर्ज काढली आहे का ? अशा विचारणा नागरीकातून सुरू केल्या आहेत . शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा भरपूर साठा असूनही अवघे वीस ते पंचवीस मिनिटे पाणी नागरिकांना मिळत आहे . तसेच वेग – वेगळ्या नागरी समस्या भेडसावत आहेत .
त्यांच्याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष आहे मात्र कर भरून देखील नगरपालिका कोणत्याही प्रकारची सुविधा नागरिकांना देत नाही . त्यामुळे घरफाळा आणि पाणीपट्टीवरील व्याज ताबडतोब रद्द करावे अन्यथा तीव्रआंदोलन पुकारले जाईल असे नागरिकांतर्फे सांगण्यात आले .
यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आतिश वाळंजु यांनी निवेदन स्वीकारले .यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, जयसिंगराव भोसले , दगडू शेणवी, सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, अमर चौगुले, प्रशांत कुडवे, निशांत जाधव, संदीप उर्फ गब्बर भारमल, तानाजी भराडे, संकेत शहा, जगदीश गुरव, संग्राम साळुंखे, निखिल कलकुटकी, गौरव साळोखे, राहुल चौगुले, नंदू खंडागळे, शुभम वंडकर, श्रीकांत सावर्डेकर, विनायक मोरबाळे, महादेव सुतार, महादेव जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .