बातमी

युवा अभ्यासक सचिनदादा पवार यांची राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रास सदिच्छा भेट

सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली ता.कागल येथील राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्रास वारकरी दर्पणचे संपादक व संत साहित्याचे युवा अभ्यासक, कीर्तनकार ह.भ.प.सचिनदादा पवार (पुणे) यांनी भेट दिली.

यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. प्रबळ इच्छाशक्ती, प्रचंड कष्ट, अपार मेहनत घेतली तर स्पर्धा परीक्षेच्या यशाचा टप्पा सहज गाठता येतो असेही ते म्हणाले.

स्वागत ज्ञानदीप एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डाॕ. अशोक पोवार यांनी केले. यावेळी सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक एस.एल.पोवार, ग्रामपंचायत सदस्य अमर पाटील, रविंद्र घराळ, गणपती पोवार, भरत सोनगेकर, एस.बी.पोवार, कृष्णात पाटील, भारत बेलवळेकर (कुरुकली) अभ्यासिकेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *