बेलवळे येथे महाशिवरात्री निमित्त अभिषेक व शिवलिलामृत ग्रंथाचे मोफत वाटप 

व्हनाळी (सागर लोहार) : महाशिवरात्री निमित्त बेलवळे  खुर्द व बस्तवडे तालुका कागल येथील महादेव मंदिरात शिवसेना तालुकाप्रमुख अशोकराव पाटील बेलवळेकर यांनी अभिषेक घालून शिवभक्तांना बेलाचे रोप ,रुद्राक्ष माळ भस्मखडा व  शिवलीलामृत ग्रंथाचे मोफत वाटप केले.

Advertisements

महाशिवरात्रीचा प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की, या दिवशी शिव तत्व आपल्या भौतिक प्राप्तीसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पृथ्वीवर अवतरीत होते. म्हणून उपवास, मंत्रोच्चार, प्रार्थना आणि ध्यान करून महाशिवरात्री साजरी केली जाते. जे महाशिवरात्रीला उपवास आणि साधना करतात त्यांना भगवान शिव आशीर्वाद देतात असे मार्गदर्शन अशोकराव पाटील यांनी शिवभक्तांना सांगितले. यावेळी लखन माळी ,संदेश वाडी ,श्री भोसले, सौरभ पाटील, विशाल पाटील ,वसंत सावंत व ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. 

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!