बातमी

गडहिंग्लज तालुक्यातील काळभैरव यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल

कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामदैवत श्री काळभैरव देवाची यात्रा दि. 6 व 7 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. यात्रा सुरळीत, सुसह्य व सुरक्षित होण्याकरिता पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 34 अन्वये रहदारी विनिमय अधिकारान्वये पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दि. 6 व 7 फेब्रुवारी या दोन दिवसांच्या कालावधीकरिता वाहतुक नियमन आदेश जारी केले आहेत.

वाहतुक मार्गात केलेले बदल-

कोल्हापूरकडून काळभैरव मार्गे येणारी वाहतुक ही दि. 6 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते दि. 7 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. ही वाहतुक सनराईस हॉटेल बहिरेवाडी मार्गे वडरगे रोडने गडहिंग्लजकडे वळवण्यात येणार आहे.

गडहिंग्लजमार्गे कोल्हापूरकडे जाणारी वाहतुक गडहिंग्लज- लाखे नगर कमान-शेंद्री-हनिमनाळ, हिटणी (कर्नाटक) मार्गे तवंदी घाट कोल्हापूरकडे वळविण्यात येणार आहे.

[ays_poll id=”7″]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *