कागल मधील दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवले

कागल /प्रतिनिधी : कागल येथून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळून नेल्याची तक्रार कागल पोलिसात नोंदविण्यात आले आहे. येथील नर्मदा अपार्टमेंट, दावणे गल्ली,  घरकुल, कागल येथील विद्या बसवानी पाटील यांनी कागल पोलिसात धाव घेतली आहे. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. एकाच वेळी, एकाच ठिकाणाहून, समान वय असणाऱ्या दोन मुली गायब … Read more

नेर्ली – विकासवाडी रस्त्याच्या (Road) कामामुळे पाणीटंचाई, नागरिक त्रस्त

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : नेर्ली गावातील नेर्ली-विकासवाडी रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. रस्त्याच्या एका बाजूचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या बाजूचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, याच कामादरम्यान दुसऱ्या बाजूच्या रस्त्याच्या खोदकामामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचा (मेन व्हॉल्व्ह) मोठा तोटा झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे, परिणामी परिसरातील नागरिकांना … Read more

कोल्हापूर हद्दवाढविरोधात ग्रामीण भागाचा कडकडीत बंद; निवडणुकीवर परिणामाची शक्यता

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीला विरोध दर्शवण्यासाठी जिल्ह्यातील २० ग्रामीण गावांनी मोठ्या प्रमाणात ‘बंद’ची हाक दिली होती. या बंदला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे, ज्यामुळे आगामी काळात हद्दवाढीचा मुद्दा अधिक ज्वलंत होण्याची चिन्हे आहेत. बंदमध्ये गोकुळ शिरगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. कणेरी मठ परिसर आणि उजळवाडी परिसरातही … Read more

भारतीय लष्कर अग्निवीर जीडी प्रवेशपत्र २०२५: लवकरच उपलब्ध होणार!

नवी दिल्ली: भारतीय लष्कराच्या अग्निवीर जनरल ड्युटी (GD) पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अग्निवीर जीडी भरती २०२५ च्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Admit Card) लवकरच joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे. तसेच, हे प्रवेशपत्र Sarkari Result वेबसाइटवरही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. प्रवेशपत्र कसे डाउनलोड कराल? * joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. * … Read more

कागल म्हाडा गृहप्रकल्पाचा प्रश्न आठ दिवसांत मार्गी लागणार: मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कागल शहरातील म्हाडा गृहप्रकल्पाबाबतही सविस्तर चर्चा झाली. यावेळी म्हाडा प्रशासनाचे अधिकारी आणि संबंधित सदनिकाधारक उपस्थित होते. या बैठकीत सदनिकाधारकांनी आपल्या समस्या मांडल्यानंतर, मंत्री मुश्रीफ यांनी तात्काळ मुंबई येथील म्हाडाच्या वरिष्ठांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि यावर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश दिले. मंत्री मुश्रीफ यांनी सदनिकाधारकांना ग्वाही … Read more

कागल नगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देयकांबाबत मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

राज्यस्तरावर धोरणात्मक निर्णयाची शक्यता कोल्हापूर: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात कागल नगरपरिषदेतील २००३ पासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमेबाबत आढावा बैठक घेण्यात आली. कागल नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संबंधित नगरपालिका प्रशासनासह जिल्हा नगर प्रशासन अधिकारी आणि संबंधित संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. … Read more

गारगोटीत क्रांतीचा हुंकार: हुतात्मा स्मारकाच्या विटंबनेने ग्रामस्थ पेटले, बेमुदत आंदोलन सुरू

गारगोटी : ज्या भूमीतून स्वातंत्र्यसंग्रामाचे स्फुल्लिंग चेतले, त्याच कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी गावात आता एका नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारक प्रशासनाने अचानक हटविल्याने गावकरी अक्षरशः पेटून उठले आहेत. या अन्यायाविरोधात गारगोटीच्या मातीने बेमुदत धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आज आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी, स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या वीरांच्या प्रतिमांना … Read more

पंतप्रधान मोदी यांचे देशांतर्गत समस्यांकडे दुर्लक्ष – संजय राऊत

संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवरून टीका मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवरून तीव्र शब्दांत टीका केली आहे. पंतप्रधान मोदी वारंवार परदेश दौरे करत असल्याबद्दल राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, देशांतर्गत महत्त्वाच्या समस्या आणि प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. … Read more

नवीद मुश्रीफ यांचा महत्वपूर्ण निर्णय: गोकुळच्या अध्यक्ष साठी असणारी महागडी गाडी विकणार

कोल्हापूर: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एक महत्त्वाचा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. अध्यक्षा साठी असलेली महागडी अधिकृत गाडी वापरण्यास त्यांनी नकार दिला असून, ती गाडी निविदा काढून विकण्याचा निर्णय त्यांच्या पहिल्याच मासिक बैठकीत घेण्यात आला आहे. नवीद मुश्रीफ यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच, … Read more

संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा! सारथीची प्रलंबित शिष्यवृत्ती अखेर खात्यात जमा

कोल्हापूर : सारथी संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांना प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती आता त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर येथील सारथी उपकेंद्राला 12 जून 2025 रोजी शासनाकडून 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मंजूर झालेला निधी प्राप्त झाला असून, त्यामधून 203 विद्यार्थ्यांना एकूण ₹4 कोटी 13 लाख 47 हजार 144 रुपयांचे वितरण … Read more

error: Content is protected !!