नवीद मुश्रीफ यांचा महत्वपूर्ण निर्णय: गोकुळच्या अध्यक्ष साठी असणारी महागडी गाडी विकणार

कोल्हापूर: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एक महत्त्वाचा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. अध्यक्षा साठी असलेली महागडी अधिकृत गाडी वापरण्यास त्यांनी नकार दिला असून, ती गाडी निविदा काढून विकण्याचा निर्णय त्यांच्या पहिल्याच मासिक बैठकीत घेण्यात आला आहे.

Advertisements

नवीद मुश्रीफ यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच, गोकुळ दूध संघाकडून मिळणारी अध्यक्षा साठी असणारी गाडी वापरणार नसल्याचे स्पष्ट केले. “माझ्याकडे स्वतःची गाडी असल्याने गोकुळची गाडी वापरणे योग्य वाटत नाही,” असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.

Advertisements

यापूर्वी गोकुळच्या संचालकांना स्कार्पिओ गाड्या पुरवण्यात आल्या होत्या, मात्र नवीन संचालक मंडळाने, विशेषतः पाटील आणि नवीद मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली, त्या गाड्यांचा वापर करण्यास नकार दिला आहे. हा निर्णय गोकुळ दूध संघाच्या कारभारात पारदर्शकता आणि काटकसर आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!