निर्भीड आणि निःपक्ष उमेदवार ‘गणपती धनगर’

शिक्षक मतदार बंधू-भगिनीनो…..       होऊ घातलेल्या दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक निवडणुकी मध्ये भटक्या विमुक्त जाती / जमाती या प्रवर्गातून ‘मासा’ हे चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून हा लढा देत आहे. संयमी नेतृत्व, सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तसेच अनेक क्षेत्रात विद्यार्थी चमकलेले अशी माझी ओळख सर्व स्तरात आहे. माझी ओळख … Read more

Advertisements

आरपीआय आठवले गट यांच्या वतीने लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन

कागल/ प्रतिनिधी : आरपीआय आठवले गट यांच्या वतीने लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या १४८ व्या जयंती निमित्त आज शाहू महाराजांची जन्मभूमी कागल येथे त्यांचे जन्मठिकाणी शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी महापुरुषांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला यावेळी शाहू राजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे चालवण्याचा निर्धार पक्षाच्या वतीने करण्यात आला. … Read more

लोकराजा शाहूंना विविध ठिकाणी अभिवादन

व्हनाळी(सागर लोहार) : दलितांचे कैवारी ,बहुजनांचे उध्दारक आणि समतेचे प्रणेते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची 147 वी जयंती कागल तालुक्यात अन्नपुर्णा शुगर कारखाना, विविध संस्था,तरूण मंडळे, संघटना, शाळा, महाविद्यलये, ग्रामपंचायत विविध ठिकाणी मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. श्री अन्नपुर्णा सहकारी पाणी पुरवठा संस्था, कै. मेजर आनंदराव घाटगे आयटीआय, समृद्धी दुध प्रकल्प यांच्या वतीने श्री अन्नपुर्णा … Read more

….अन मायाबाई बनल्या हिरकणी

मुरगूड ( शशी दरेकर ): सत्यवानाचे प्राण वाचवण्याची पौराणिक महत्ती असणाऱ्या वटपौर्णिमेदिवशी एका हिरकणीने दुसऱ्या माऊलीच्या मुलाचे प्राण वाचवण्याचे धाडस केवळ असामान्य आणि गौरवास्पद’ असे मत प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी केले. या कामगिरीचे माहेरच्या लोकांनी केलेले कौतुक पाहून कृतार्थ झाल्याची भावना त्या माऊलीने व्यक्त केली. सौ. माया सुभाष साठे रा. कसबा वाळवे ता. राधानगरी … Read more

मुरगूड येथील सुवर्णमहोत्सवी ” श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. अनंत फर्नांडीस तर व्हा. चेअरमनपदी श्री. विनय पोतदार

मुरगूड( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील सुवर्णमहोत्सवी श्री , लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन२०२२ते २०२७सालासाठी संस्थेच्या चेअरमनपदी श्री. अनंत बस्तू फर्नांडीस तर व्हा. चेअरमनपदी श्री. विनय शत्रुघ्न पोतदार यांची एकमताने निवड झाली. संस्थेच्या या निवडीप्रसंगी अध्यक्षपदी सहाय्यक निबंधकसो श्री. युसुफ अ. शेख हे होते . यावेळी जेष्ठ संचालक श्री . जवाहर शहा … Read more

सुभद्रामाता हायस्कुलचा १०० टक्के निकाल

व्हनाळी (वार्ताहर) : साके ता. कागल येथील कै. सौ. सुभद्रामाता आशिर्वाद माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता 10 वी चा निकाल 100 टक्के लागला आहे. शाळेत प्रथम क्रमांक कु. प्राजक्ता धनाजी जाधव कु. प्रणव तनाजी पाटील (द्वितीय), पृथ्वीराज राजाराम पाटील (तृतीय) क्रमांक मिळवले. शाळेने याही वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांना निवृत मुख्याध्यापक बी. डी. … Read more

सिद्धार्थ ने दहावीचेही मैदान जिंकले

इयत्ता दहावीत 90 टक्के गुण ; शैक्षणिक क्षेत्रातही तो आघाडीवरचं व्हनाळी (सागर लोहार) : साके ता.कागल येथील पैलवान सिद्धार्थ रविंद्र इंगळे यांने कुस्ती क्षेत्राबरोबरच इयत्ता दहावीचेही उत्कृष्ठरित्या मैदान मारले आहे. त्याला इयत्ता दहावीमध्ये 90 टक्के गुण मिळाले आहेत. शिवछत्रपती कुस्ती संकुल बाचणी येथे वस्ताद तानाजी गवसे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम व कुस्तीचा सराव करत आहे. राज्यस्तरीय,विभागीयस्तरीय … Read more

खासगी आधार संच सुरु करण्यासाठी पात्र अर्जदारांनी 27 व 28 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित रहावे – निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव

कोल्हापूर, दि. 23 : स्वत:चे खासगी आधार संच असणाऱ्या अर्जदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://kolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. या यादीतील प्राथमिक स्वरुपात पात्र झालेल्या अर्जदारांनी दि. 27 व 28 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी केले आहे. जिल्ह्यातील निश्चित केलेल्या ठिकाणामधील शासकीय कार्यालयीन जागेत तात्पुरत्या … Read more

कागल पंचायत समितीचे कार्य उल्लेखनीय

कागल/ प्रतिनिधी : कागल पंचायत समितीचे कार्य सर्व स्तरावर उल्लेखनीय आहे. चांगल्या कामातून यापूर्वी पुरस्कार मिळाले आहेत .यापुढेही मिळत राहतील. सर्व विभागप्रमुख ,अधिकारी, ग्रामसेवक, आशा ,अंगणवाडी या सर्व कर्मचाऱ्यांच्या मुळेच कागल पंचायत समितीचे कार्य दैदिप्यमान होत आहे .असे गौरवोद्गगार गटविकास अधिकारी सुशिलकुमार संसारे यांनी काढले. कागल पंचायत समितीच्या कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांची समन्वय बैठक पार … Read more

मुरगूडमध्ये जेष्ठ नागरीक संघामार्फत ” जागतिक योग दिन “उत्साहात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघ मुरगूड या संस्थेच्यावतीने ” जागतिक योग दिन ”संघाच्या विरंगुळा केंद्रात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक दिनाचे औचित्य साधून दोन दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. २१ जून हा दिवस ” जागतिक योग दिन ” म्हणून साजरा केला जातो . मानवी जीवनात योगाचे … Read more

error: Content is protected !!