लेखापरिक्षित वार्षिक हिशेबपत्रके 25 जुलै पर्यंत ऑनलाईन दाखल करा – धर्मादाय सह आयुक्त शशिकांत हेर्लेकर
कोल्हापूर, दि. 18 : ज्या सार्वजनिक न्यासांनी अद्यापपर्यंत मागील प्रलंबित व दि. 31 मार्च 2021 पर्यंतच्या त्यांच्या अद्यावत वार्षिक हिशोबपत्रकांचे लेखापरीक्षण केलेले नाही, त्यांनी ते तात्काळ करुन घ्यावे व लेखापरिक्षित वार्षिक हिशेबपत्रके कोणत्याही परिस्थितीत दि. 25 जुलै पर्यंत संबंधित धर्मादाय आयुक्त कार्यालयात ऑनलाईन दाखल करावेत, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी केले आहे. … Read more