अंमली पदार्थांपासून विद्यार्थ्यांना परावृत्त करण्यासाठी ‘दफ्तर तपासणी मोहीम – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

collector

विद्यार्थी, युवक, पालकांमध्ये व्यापक जनजागृती करा अंमली पदार्थांची खरेदी, विक्री, साठा, वाहतुक आढळल्यास पोलीस विभागाशी संपर्क साधा कोल्हापूर, दि. 8 : अंमली पदार्थांच्या व्यसनापासून विद्यार्थी व युवकांना परावृत्त करण्यासाठी व्यापक जनजागृती करा, अशा सूचना करुन माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयातील मुले अंमली पदार्थ जवळ बाळगू नयेत, यासाठी शाळा, महाविद्यालयांनी महिन्यातून दोनदा अचानकपणे विद्यार्थ्यांची दफ्तर … Read more

मुरगूडच्या सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर; सभासदांना १५% लाभांश देण्याची घोषणा मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील आपुलकी, जिव्हाळा व विश्वासाबरोबरच सभासद, ग्राहकांच्या पसंतीत उतरलेली मुरगूडची -सुवर्ण महोत्सवी श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पत संस्थेची ५७ वार्षिक सर्व साधारण सभा अत्यंत शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अजेंड्या वरील सर्वच्या सर्व विषय … Read more

प्रशासन व लोकप्रतिनिधी मिळून ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान यशस्वी करु – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

collector

9 ते 14 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक गावात एकाच दिवशी विविध पाच कार्यक्रमांचे आयोजन कोल्हापूर :  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रमांतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या अभियानाची तयारी प्रत्येक गावात व शहरात अंतिम टप्प्यात आली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी मिळून ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियान यशस्वी … Read more

कागल तालुक्यातील कोतवाल भरती होणार

कागल (विक्रांत कोरे) : कागल तालुक्यातील सात सज्याच्या ठिकाणी कोतवाल भरती होणार आहे. या भरती बाबत दहा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता कागल तहसील कार्यालयात आरक्षण सोडत होणार आहे. सज्याच्या संबंधित गावातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कागलचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी केले आहे. कागल तालुक्यात कोतवाल संवर्गातील रिक्त पदे आरक्षण निहाय भरण्यात येणार आहेत. … Read more

यशवंतराव घाटगे हायस्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये गुणवंतांचा सत्कार

कागल : मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे. जेथे जाल तेथे चांगले यश मिळवून कुटुंबाचे, गावाचे, शाळेचे व संस्थेचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन श्री शिवराय शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमंत मृगनयनाराजे घाटगे यांनी केले. कागल येथील श्री यशवंतराव घाटगे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये परीक्षेत विशेष गुणवत्तेसह व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ झाला. व्यासपीठावर … Read more

जिल्ह्यातील 20 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरु झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 20 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.पंचगंगा नदीवरील – शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ.भोगावती नदीवरील – तारळे, हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे.वारणा नदीवरील – चिंचोली, माणगांव, तांदूळवाडी व खोची.दुधगंगा नदीवरील – दत्तवाडकासारी नदीवरील – यवलूज, पुनाळ तिरपण … Read more

मुरगूडच्या शिवाजी विद्या मंदिर शाळा नंबर 2 च्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विजय मेंडके तर उपाध्यक्षपदी रेणू सातवेकर यांची निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील शिवाजी विद्या मंदिर च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी विजय कृष्णात मेंडके यांची तर उपाध्यक्षपदी सौ. रेणू राजकिरण सातवेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी अध्यक्ष फौजी निशांत जाधव तर प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक प्रविण आ़ंगज आनिल बोटे होते. यावेळी इतर सदस्य अमर(छोटू)चौगुले, … Read more

कोल्हापूर जिल्हा क्रीडा विभागासाठी भरघोस निधी द्या : युवा नेते वीरेंद्र मंडलिक यांनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली मागणी

मुरगूड ( शशी दरेकर ) : कोल्हापूर जिल्हा क्रीडा क्षेत्रात सदैव उल्लेखनीय कामगिरी करत असतो कुस्ती, कबड्डी, फुटबॉल, स्विमिंग, तिरंदाजी यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे अनेक खेळाडू महाराष्ट्राला व देशाला या कोल्हापूर जिल्ह्यातून दिले गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा व महाराष्ट्राचा नावलौकिक आणखी वाढवायचा असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला राज्याश्रय मोठ्या प्रमाणात मिळावा यासाठी प्रत्येक गावातील … Read more

गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी सानिका स्पोर्ट्स ठामपणे उभा – दगडू शेणवी

मुरगुड ( शशी दरेकर ) – गरीब गरजू हुशार होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य फी संदर्भात जर काही अडचणी येत असतील तर मुरगुड ता. कागल येथील सानिका स्पोर्ट्स फाउंडेशन ठामपणे उभा आहे. विद्यार्थ्यांनी निसंकोचपणे आपल्या अडचणी मंडळाच्या कार्यकर्त्याजवळ व्यक्त केल्यास त्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल मदतीचा हात सदैव पुढे राहील असे प्रतिपादन सानिका स्पोर्ट्स फाऊंडेशनचे … Read more

मुरगूड कुरणी दरम्यानच्या पुलावरील खड्यात वृक्षारोपन करून आंदोलन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड कुरणी दरम्यानच्या वेदगंगा नदीवरील पुलावर चार व दोन्ही बाजूस मोठे खड्डे पडले आहेत. वाहतुकीस धोकादायक असलेले हे खड्डे तातडीने पाटबंधारे उपविभाग निढोरी यांनी मुजवण्याची वांरवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ या खड्यात आज विविध सामाजिक संघटनानी वृक्षारोपन करून आंदोलन केले. मुरगूड कुरणी दरम्यान, वेदगंगा नदीवर १९६७ साली … Read more

error: Content is protected !!