मुरगूड शहर निसर्गमित्रने केली डोंगर माथ्यावर हजारो बियांची हवाई पेरणी

वृक्षारोपण व वृक्षाचा वाढदिवसही साजरा उपक्रमाचे २० वे वर्ष मुरगूड ( शशी दरेकर ) : जागतिक तापमान वाढीच्या महाभयंकर वैश्विक संकटावर वृक्षारोपण ही एकच प्रभावी उपाय योजना आहे. असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार सन्मानीत डॉ .मा ग गुरव यांनी केले. ते जागतिक पर्यावरण दिनी मुरगूड शहर निसर्गमित्र मंडळाचे वतिने आयोजित वृक्षाचा वाढदिवस, परिसरातील डोंगरमाथ्यावर बियांची हवाई … Read more

Advertisements

काँग्रेसच्या विजयात कागल मधून  घाटगे पिता-पुत्रांचे लिड

पहिल्यांदा पांठिबा देवून शेवटपर्यंत प्रचारात उठवले रान व्हनाळी (वार्ताहर) : लोकसभेचे कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना या निवडणूकीत कागल तालुक्य़ातून उदंड प्रतिसाद लाभला. शाहू महाराजांच्या प्रचारादरम्यान बैठका, पदयात्रा आणि जाहिर सभांना झालेली प्रचंड गर्दी आणि विरोधात तालुक्यातील विद्यमान खासदार उमेदवार असूनही त्यांच्या विरोधात उघड- उगड बोलणारे सामान्य लोक यामुळे वैचारीक लढाईत … Read more

कागल मध्ये निकाल लागण्याआधी बीजेपी विजयाचा बोर्डची चर्चा सर्वत्र

कागल : कागल मधील बीजेपी कार्यकर्ते व आसिफ मुल्ला प्रेमी यांच्या वतीने भारताचे भविष्य माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महा विजय 2024, १ धून ४ जून असा भव्य २५ बाय ५० अवधव्य बॅनर जय हिंद हॉटेल कणेरी समोर लावण्यात आला. या होर्डिंगची चर्चा पूर्ण कागल तालुका व कोल्हापूर जिल्ह्यात सुरू या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे … Read more

फिरावयास गेलेलया महिलांना भरधाव वाहनाची धडक एकीचा मृत्यू , एक गंभीर

बिद्री शीतकरण केंद्राजवळ अपघात मुरगूड (शशी दरेकर) – गारगोटी -कोल्हापूर राज्यमार्गावर रविवारी सकाळी फिरावयास गेलेल्या दोन महिलानां दूध शीतकरण केंद्राजवळ भरधाव वाहनाने धडक दिली . या अपघातात शांताबाई नामदेव कुंभार (वय ७२) रा. बोरवडे कुंभारवाडा (ता. कागल) या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या बरोबर असणाऱ्या आनंदी आनंदा परीट (वय ७०) रा. बोरवडे (ता. कागल) … Read more

मुरगूड विद्यालयात रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

37 वर्षानंतर विद्यार्थ्यांनी अनुभवला गुरुजणांचा तास मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड विद्यालय (हायस्कूल) ज्युनिअर कॉलेज मुरगूड या शाळेतील 1987 च्या बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला.तब्बल 37 वर्षानंतर भरलेल्या या स्नेह मेळाव्यात वय 55 गाठलेले 130 तरुण विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.सकाळी आठ पासूनच विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थी जमू लागले.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वहात होता.37 वर्षापासून … Read more

वाघापूरात अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

मडिलगे( जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथे समस्त धनगर बांधव यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी  जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर दत्तात्रय वाघमोडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी धनगर समाजाप्रती दिलेले योगदान तसेच त्यांच्या धगधगत्या संघर्षाची  यशोगाथा वाघमोडे यांनी मांडली. यावेळी जोतीराम डोणे, बिरू डोणे, … Read more

मुरगुडात एसटीचा 76 वा वर्धापन दिन प्रवासी व अधिकाऱ्यांच्या सत्काराने संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मूरगूडच्या बस स्थानकावर एसटीचा 76 वा वाढदिवसानिमित एसटीतील प्रवासी आणि अधिकारी यांचा सत्कार तसेच केक कापण्यात आला.          स्वागत वाहतूक नियंत्रक शशिकांत लिमकर यांनी केले. यावेळी सेवानिवृत्ती निमित्त मुरगूडचे वाहतूक नियंत्रक पांडुरंग लोकरे तसेच ‘शिवराज’चे सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक रवींद्र शिंदे यांचा एसटी विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकात राजू … Read more

लाल परी (एस टी) चा ७६ वा वर्धापन दिन राज्यभर संपन्न होणार

मुरगूड ( शशी दरेकर ) : गेली शहात्तर वर्षे महाराष्ट्राची जीवन वहिनी म्हणून ख्याती पावलेली लाल परी (एस टी) १ जूनला ७६ वा वर्धापन दिन साजरा करत आहे.    राज्यातील सर्व बस स्थानके फुल माला व तोरणे लावून सजवली जातील.प्रवासी,वाहक,चालक आणि सर्व कर्मचारी वर्ग यांचे ऋणानुबंध लाल परीने उराशी जपून ठेवले आहेत.       नोकरी वर … Read more

राक्षसी आकाराचे दुर्मिळ फुलपाखरू कागल येथे दिसले

कागल : येथील भुयेकर पेट्रोल पंप शेजारी असलेल्या मास्टर शेफ बिर्याणी मझहर पठाण यांच्या बिर्याणी सेंटर जवळील झाडावर राक्षसी आकाराचे दुर्मिळ जातीचे फुलपाखरू दिसले. या फुलपाखराला पाहण्यसाठी लोकांनी गर्दी केली होती. या फुलपाखराचा आकार तळहाता एवढा आहे. अतिशय सुंदर अशा करड्या रंगाच्या या फुलपाखरांच्या दोन्ही बाजूवरील पंखावर दोन मानवी डोळ्यासारखे पारदर्शक गोल आहेत. हे फुलपाखरू … Read more

सिस्टीम दुरुस्त करायची असेल तर कडक पावले उचलावी लागतील – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

दोषीना जन्माची अद्दल घडण्यासाठी कडक पावले उचलू     कोल्हापूर, दि. ३०: पुण्यातील ससून हॉस्पिटलसारख्या घटना व्हायच्या नसतील तर व्यवस्था खालून वरपर्यंत दुरुस्त करावी लागेल. व्यवस्थेमध्ये पारदर्शीपणा आणावा लागेल. हे ऑपरेशन नक्कीच करू. एकाही माणसाला माझे सर्टिफिकेट बदलले किंवा माझ्यावर अन्याय झालाय असं सांगायला वाव राहणार नाही अशी व्यवस्था निर्माण करू, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष … Read more

error: Content is protected !!