कागलमध्ये डेंग्यूसदृश्य आजाराने २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू

कागल (प्रतिनिधी): कागल येथील २४ वर्षीय तरुणी आद्या विश्वजीत संकपाळ हिचा डेंग्यूसदृश्य आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला. आद्या ही चायनीज भाषेची अभ्यासक आणि भूगर्भशास्त्रात बीएससी पदवीधर होती. तिच्या निधनाने कागल परिसरात शोककळा पसरली आहे. आद्याला गुरुवारी अशक्तपणा आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डेंग्यूसदृश्य लक्षणे दिसत असल्याने डॉक्टरांनी तिला कोल्हापूर येथील … Read more

Advertisements

कागल पोलिस ठाण्यात व्यापाऱ्यांसाठी सुरक्षा बैठक संपन्न

कागल : कागल शहरातील व्यापाऱ्यांसाठी सुरक्षा विषयक मार्गदर्शन करण्यासाठी कागल पोलिस ठाण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी व्यापाऱ्यांना सुरक्षित व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची माहिती सांगितली. सुरक्षितता विषयी माहिती देताना लोहार म्हणाले की दुकानदारांनी रात्रीच्या वेळी स्पष्ट चित्र दिसतील असे सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत.   दुकानात जास्त रोख रक्कम ठेवू … Read more

शाळेतील वर्गखोल्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी देणार – शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर

मुंबई, दि. २४ : राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. राज्यातीला सर्व शाळांमध्ये नवीन शाळा खोल्या बांधण्याबरोबरच  जुन्या शाळेतील वर्गखोल्या दुरुस्तीसाठी आराखडा तयार करून या कामासाठी आवश्यक निधी दिला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली. सदस्य कैलास घाडगे-पाटील यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला … Read more

जागतिक वन दिनानिमित्त पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव खुर्द येथे पक्षी निरीक्षण

पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : जागतिक वन दिनाचे औचित्य साधून  पिंपळगाव खुर्द येथील गाव तलावा जवळ पक्षी निरीक्षणाचा उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतला. पक्षी अभ्यासक व शिक्षक वैभव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 7:45 वाजता या उपक्रमाची सुरुवात झाली. पक्षी निरीक्षणाबरोबरच पक्षांची गणना सुद्धा करण्यात आली. पक्षांमधील जैवविविधता त्यांचे … Read more

कागलच्या श्लोक पाटील यांच्या दोन चित्रांची राष्ट्रीय स्तरावरील चित्र प्रदर्शनात निवड

कागल : कागलमधील  श्लोक दिपक पाटील यांच्या दोन चित्रांची राष्ट्रीय स्तरावरील चित्र प्रदर्शनामध्ये निवड झाली आहे. मनिकर्णिका आर्ट गॅलरीतर्फे आयोजित ६९ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनामध्ये त्यांच्या चित्रांची निवड झाली. देशभरातील स्पर्धकांमधून फक्त ४७ स्पर्धकांची निवड झाली, त्यामध्ये श्लोक पाटील यांच्या दोन चित्रांचा समावेश आहे. मनिकर्णिका आर्ट गॅलरी गेल्या पाच वर्षांपासून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने चित्रकला … Read more

वाघापूरात जळ यात्रेचे तयारी पूर्ण

मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथील महाराष्ट्र तसेच कर्नाटक मधील असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल बिरदेव देवाची त्रैवार्षिक जळ यात्रेची तयारी पूर्ण झाली असून स्थानिक देवस्थान समिती व ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडून परिश्रम घेतले जात असून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. यावेळी आज शनिवार दिनांक 22 रोजी सुहासिनी … Read more

मुरगूड येथील राजर्षी शाहू पतसंस्थे तर्फे नेत्र तपासणी शिबीर संपन्न

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथिल सर्व परिचीत असणारी सुवर्णमहोत्सवी राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे व नॅब नेत्र रुग्णालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी व सुवर्णमहोत्सवी वर्षाचे निमित्य साधून नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर नुकतेच संपन्न झाले. या शिबिरास उस्पूर्त प्रतिसाद लाभला. सदर शिबीराचे अदघाटन मुरगूडचे माजी नगराध्यक्ष व संस्थेचे सभासद … Read more

विद्युत केबल चोरी प्रकरणी दोघांना अटक

कागल (प्रतिनिधी): कागल तालुक्यातील आनूर गावात शेतातील विद्युत केबल चोरी प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तानाजी हरिसिंग कळाप्पा पोवार (वय ३०) आणि सादेव लक्ष्मण दळवाळे (वय ३०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मूळचे कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील ताळीकोटी येथील रहिवासी आहेत. सध्या ते कागल तालुक्यातील केनवडे फाटा येथे राहत होते. पोलिसांनी दिलेल्या … Read more

दिशा सालियन मृत्यू प्रकरण विधानसभेत चर्चेचा धुरळा, जनतेचे प्रश्न दुर्लक्षित

न्यायालयीन सुनावणीवर विधानसभेत चर्चा योग्य की अयोग्य ? मुंबई : दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधानसभेत या प्रकरणावर जोरदार चर्चा झाली, मात्र जनतेने निवडून दिलेले आमदार जनतेच्या प्रश्नांना बगल देत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.            दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्राच्या विधानसभेत जोरदार चर्चा झाली. या … Read more

कागल नगरीमध्ये निरंकारी सत्संग सोहळा अत्यंत उत्साहात साजरा

कागल (प्रतिनिधी) : निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा  महाराज यांच्या पावन कृपा आशिर्वादाने कागल मधील दुधगंगा विद्यालयाच्या भव्य पटांगणामध्ये आध्यात्मिक प्रवचनाचा कार्यक्रम अंत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला. युवा कीर्तनकार तेजस घोरपडे यांनी मुख्य प्रवचनाचा सारं सांगितला. ते म्हणाले, चौऱ्यांशी लक्ष प्रकारचे जिवाचे फेरे आहेत . त्यातून मिळालेल्या मनुष्य जन्माचे कल्याण केवळ समयाच्या सदगुरू कडून प्राप्त होणाऱ्या … Read more

error: Content is protected !!