कागल तालुक्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’चा ग्रामसभांमधून शुभारंभ

कागल (प्रतिनिधी) : राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि ग्रामीण पातळीवर गावचा शाश्वत विकास साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ आज, बुधवार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या अभियानाच्या अनुषंगाने, कागल तालुक्यात … Read more

Advertisements

कागल येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे यशस्वी आयोजन, २ कोटी ८५ लाखांची विक्रमी वसुली

कागल (प्रतिनिधी): राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार, कागल येथील दिवाणी न्यायालयात (कनिष्ठ स्तर) १३ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, विविध प्रकारची प्रलंबित आणि दावा दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. यातून एकूण २ कोटी ८५ … Read more

आंतरराष्ट्रीय चालक दिनानिमित्त उजळाईवाडी पोलिसांकडून वाहनचालकांचा गौरव

कागल (सलीम शेख ) : राष्ट्रीय महामार्ग पोलीस उपकेंद्र, उजळाईवाडी यांच्या वतीने आज, १७ सप्टेंबर २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय चालक दिनानिमित्त राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील आरटीओ चेक पोस्ट नाका, कागल येथे एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अवजड वाहनचालक आणि एसटी चालकांशी संवाद साधून त्यांच्या कामाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी, पी.एस.आय … Read more

श्री. शिवाजीराजे व्या. ना. सह. पतसंस्था देणार सभासदांना १३% डिव्हीडंड

३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा पेठ वडगाव (सुहास घोदे) : श्री शिवाजीराजे व्यापारी नागरी सह. पतसंस्था मर्या; पेठ वडगावची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि.१४ सप्टेंबर २०२५ रोजी जिप्सी रेस्टॉरंट, भादोले रोड, पेठ वडगाव येथे खेळीमेळीचे वातावरणात पार पडली. दीप प्रज्वलन व श्री शिवप्रतिमेच्या पुजनाने सभेच्या कार्यक्रमास सुरूवात झाली. संस्था सभासदांनी संस्थेच्या कारभारावर दाखविलेला … Read more

जयभवानी पतसंस्थेच्या शाखांचा विस्तार लवकरच : श्री. गुलाबराव पोळ (माजी पोलीस अधिकारी)

पेठ वडगाव (सुहास घोदे) : आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने स्थिरावलेल्या जयभवानी अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये ४१ वा वार्षिक सभासद सन्मेलन नुकतेच उत्साहात पार पडले. संस्थेचे अध्यक्ष श्री. गुलाबराव पोख यांनी सांगितले की, पतसंस्थेच्या शाखांचा लवकरच विस्तार करण्यात येणार आहे. संस्थेचा आर्थिक विकास आणि पारदर्शी व्यवहारामुळे सभासदांचा संस्थेवर विश्वास वाढत असून, ग्राहकांना अद्ययावत सेवा देण्याचा संस्थेचा प्रयत्न राहील. … Read more

खड्डे बुजवण्याचे काम थांबले, नव्याने होणार ४० फुटांचा रस्ता

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील नाका नंबर एक समोर खड्ड्यांचे साम्राज्य वाढले होते तसेच पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साठल्यामुळे मुरगुड शहरांमध्ये प्रवेश करण्यासाठी या खड्ड्यामधूनच प्रवास करावा लागत होता. आज त्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदार आल्याचे समजतात नागरिकांनी हे काम बंद पाडून या ठिकाणी पूर्ण 40 फुटाचा रस्ता करण्याची मागणी केली यानंतर … Read more

नामदार गोपाळकृष्ण गोखले विद्या मंदिर कागल येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

कागल : देशाचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी गोपाळकृष्ण गोखले विद्या मंदिर, कागल येथे शिक्षक दिन विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात इयत्ता सहावी व सातवीमधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत प्रवेश करून अध्यापनाचे धडे घेतले. स्वरा वडगाव, पूजा लोहार, वेदांत सोनुले, मधुरा कोरवी, आफान बागवान व अनुज सनगर … Read more

कागल पालिकेच्या उर्दू – मराठी शाळेसाठी शासनाकडून जागा मंजूर

मुस्लिम जमियतने मंत्री हसन मुश्रीफ यांचे मानले आभार कागल / प्रतिनिधी – कागल येथील पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू मराठी शाळेसाठी अत्यंत मर्यादित जागा उपलब्ध होती. ही बाब लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अथक व सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे उर्दू मराठी शाळेसाठी तसेच वसतिगृहासाठी जागा उपलब्ध झाली आहे. यामुळे मुस्लिम  जमियतच्यावतीने मंत्री मुश्रीफ यांचे पत्रकार … Read more

कागल पंचायत समितीचा ‘एक दिवस घरकुलासाठी’ उपक्रम; ४११२ लाभार्थ्यांना भेटी

कागल, प्रतिनिधी: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल मंजूर होऊनही बांधकाम सुरू न केलेल्या लाभार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कागल पंचायत समितीने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ‘एक दिवस घरकुलासाठी 2.0’ या नावाने, प्रशासक तथा गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्या संकल्पनेतून, गुरुवार, दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी हा उपक्रम संपूर्ण तालुक्यात राबविण्यात आला. या अंतर्गत, तब्बल … Read more

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न : तज्ञ समितीच्या बैठकीतून पुढचा प्रवास

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न हा केवळ भूभागाशी संबंधित वाद नाही, तर तो थेट सीमा भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. शिक्षण, शासकीय सुविधा, शिष्यवृत्ती ते अनुदान यांसारख्या प्रश्नांमध्ये या भागातील लोकसंख्येला कायमस्वरूपी संघर्ष करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात नुकतीच झालेली तज्ञ समितीची बैठक महत्त्वाची ठरली आहे. नियमित बैठकांचा निर्णय : सातत्याचा दृष्टीकोन समितीच्या बैठकीत … Read more

error: Content is protected !!