स्वर्गीय राजे विक्रम सिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार 2020 व 21 वितरण कार्यक्रम संपन्न

कागल : स्वर्गीय राजे विक्रम सिंह घाटगे फौंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती कागल यांच्या वतीने स्वर्गीय राजे विक्रम सिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार 2020 व 21 वितरण कार्यक्रम दत्तप्रसाद हॉल मुरगूड येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे आईसाहेब शुभ हस्ते राजे समरजितसिंह घाटगे अध्यक्ष शाहू साखर कारखाना होते. स्वर्गीय राजे विक्रम सिंह … Read more

Advertisements

साके परिसरात महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

साके(सागर लोहार): राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती शनिवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय,विविध कार्यकारी सोसायट्या, शाळा, महाविद्यालयांमध्ये महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. विविध मान्यवरांनी त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाविषयी मान्यवरांनी … Read more

मयुरेश जाधव ची नवोदय विद्यालय साठी निवड

मडिलगे(जोतीराम पोवार) : कुरुकली तालुका कागल येथील मयुरेश सागर जाधव यांची कागल येथील जवाहर नवोदय विद्यालय साठी नुकतीच निवड झाली तो विद्यामंदिर सोनगे तालुका कागल येथील शाळेचा विद्यार्थी आहे त्याला शाळेचे मुख्याध्यापक आण्णा पाटील, यांचे प्रोत्साहन तर शिक्षिका मंगल भोई कुरुकली येथील विद्यामंदिर हंबीरराव नगरचे मुख्याध्यापक संतोष पायमल्ले, सागर डवरी, श्री क्लासेस बेनिक्रेचे मनोज रामशे, … Read more

कागल नगरपालिकेत महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मृतीस अभिवादन

कागल(प्रतिनिधी): कागल नगरपालिकेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व भारताचे दुसरे प्रधानमंत्री भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली यावेळी महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन उपनगराध्यक्ष विवेक लोटे व पालिका मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच ज्येष्ठ गुरुजी श्री चौगुले सर यांच्या हस्ते … Read more

वनमित्र संस्था,कागल व शिवराज्य मंच,कागल यांचे वतीने गांधी जयंती उत्साहात साजरी

कागल : आज 2 ऑक्टोंबर 2021 रोजी श्री महात्मा गांधी जयंती निमित्त कै.काँ. प्रवीण जाधव बालसंस्कार केंद्र, करनुर येथे गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधीजी, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. श्री अशोक शिरोळे यांनी थोर समाजसुधारक व व्यक्तींच्या … Read more

मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रकाश चौगले यांचे आकस्मिक निधन

मुरगूड ( शशी दरेकर ) :जून्या पिढीतील नामवंत मल्ल उपमहापौर केसरी आणि मुरगूडचे माजी नगराध्यक्ष पैलवान प्रकाश सखाराम चौगले (वय ६२ ) यांचे शुक्रवार दि. १ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्यांने आकस्मिक निधन झाले. मुरगूडच्या सामाजिक , राजकीय व क्रीडाक्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते .विद्यार्थी दशेत असतानाच त्यांनी कोल्हापूरच्या काळाईमाम तालमीत कुस्तीचे धडे गिरविले. … Read more

शाहू साखर कारखाना इथेनॉल निर्मितीत वाढ करण्यासाठी दैनंदिन १०० किलो लिटर (के एल पी डी )क्षमतेचा प्रकल्प उभारणार- समरजितसिंह घाटगे

४४ वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न कागल(विक्रांत कोरे): शाहू साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने सध्या होत असलेल्या इथेनॉल निर्मितीमध्ये आणखी वाढ करण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यासाठी दैनंदिन १०० किलो लिटर (के एल पी डी )क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.अशी घोषणा शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली. श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर … Read more

भातमळणीच्या सुगीला झाली सुरूवात

खळ्य़ावरील मळणी दुर्मिळ, जाग्याअभावी मळण्या रस्त्यावरचं साके( सागर लोहार ): महापूर ,अवकाळी पाऊस यामुळे यंदाच्या भात कापणी मळणीचा सुगीचा हंगाम धोक्यात आला आहे. त्यात गेली चार दिवस पावसाने विश्रांकी घेतली आहे पण पैरापद्धतीमुळे मजूर मिळेनात, अशी अवस्था शेतक-यांची झाली आहे. कमी दिवसात कापणीला आलेल्या सुधारीत भात वाणांची सध्या कापणी मळणी करण्यास शेतक-यांनी सुरूवात केली आहे. … Read more

हसन मुश्रीफ,संजय घाटगे शुन्यातून विश्व निर्माण करणारे नेते : के.पी.पाटील

केनवडे येथे अन्नपुर्णा शुगर चा दुसरा गळीत हंगाम शुभारंभ साके(सागर लोहार): गेल्या अनेक वर्षात कोणतीही फार मोठी राजकिय प्रबळ सत्ता, आर्थिक संपत्ती नसतानाही कठीण परिस्थीतीत कार्यकर्त्यांच्या पाठबळावर माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स हा कारखाना उभा केला आहे. त्याचा आज द्वितीय गळीत हंगाम शुभारभं माझ्या हस्ते होतोय हे मी माझे … Read more

गडहिंग्लज मध्ये सराफाची ३ लाख २१ हजाराची फसवणूक

गडहिंग्लज – धनंजय शेटके रविवारी तारीख २६ रोजी गडहिंग्लज मधील राणी लक्ष्मीबाई रोड वरील मडलगी ज्वेलर्स या सोन्याच्या शोरुम मध्ये सांगलीच्या एका युवकाने सोन्याची अंगठी,मंगळसूत्र, लॉकेट,गंठन,गळ्यातील चेन असे असे दागिने खरेदी केले तसेच जीएसटी सह एकूण ३ लाख २१ हजार रुपयांचे ऑनलाईन पेमेंट केले. तसेच काही रक्कम चेकेने देऊ केली शोरुम चे मॅनेजर रावसाहेब कुरळे … Read more

error: Content is protected !!