गडहिंग्लज मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून किरीट सोमय्या यांचा तिरडी मोर्चा काढून निषेध करण्यात आला

गडहिंग्लज – धनंजय शेटके आज दुपारी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील अनेक मंत्र्यांच्यावर विविध घोटाळ्यांचे आरोप केले असून या मध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे देखील नाव घेतले असून त्यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचा तसेच हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्या मध्ये गैर कारभार झाल्याचा आरोप केला आहे.त्या मुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी … Read more

Advertisements

कोल्हापूरसह, इचलकरंजी, हातणंगले, कागल, मुरगुड, बिद्री, खडकेवडा येथे किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध

मंत्री मुश्रीफ यांच्या बदनामी बद्दल कागलमध्ये काढली अत्यंयात्रा कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या बदनामी बद्दल कोल्हापूर सह इचलकरंजी हातकणंगले कागल मुरगुड बिद्री खडकेवाडा येथे निषेध करण्यात आला. खालील कोल्हापुरात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी श्री सोमय्या यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या यामध्ये जिल्हाध्यक्ष ए वाय … Read more

कागलचे नुतन पोलिस निरीक्षक संजय गोरले यांचा शिवसेनेमार्फत सत्कार

साके (सागर लोहार) : कागल पोलिस स्टेशन चे नुतन पोलीस निरीक्षक म्हणून संजय गोरले यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे त्याबद्द त्यांचा कागल तालुका शिवसेना – युवासेनेच्या वतीने तालुका प्रमुख अशोक पाटील (बेलवलेकर) यांचे हस्ते शिवसैनिकांच्या उपस्थीत पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारा उत्तर देतांना नुतन पोलिस निरिक्षक संजय गोरले म्हणाले, सामाजिक बांधिलकीतून सर्वच पक्ष … Read more

सोमय्या यांच्या विरोधात फौजदारी अब्रू नुकसानीचा १०० कोटींचा दावा दाखल करणार- मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले भ्रष्टाचाराचे सर्व आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फेटाळून लावले आहेत. कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सोमय्या यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यावर निशाणा साधला. चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. तसेच … Read more

विकासकामातून गावा- गावांचा कायापालट करा – मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

 हसूर बुद्रुकला साडेतीन कोटींच्या विकासकामांची उद्घाटने सेनापती कापशी : ग्रामविकास खाते ही विकासाची गंगा आहे. गट -तट न मानता विकासकामांच्या माध्यमातून गावा- गावांचा कायापालट करा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. हासूर बुद्रुक ता. कागल येथे विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव … Read more

२१ दिवसाच्या प्रतिक्षेनंतर कागल पोलीस ठाण्यास पोलीस निरीक्षक नियुक्त

कागल : तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय नाळे यांची जुना राजवाडा पोलिस ठाणे कोल्हापूर येथे बदली झाली त्यांची बदली होऊन जवळजवळ एकवीस दिवस झाले, पोलिस निरीक्षक पदी अजून पर्यंत रिक्त होते सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी २१ दिवस कागल पोलीस ठाण्याचा प्रभारी कार्यभार पहिला, २१ दिवसानंतर आता कागल पोलीस निरीक्षक पदी श्री संजय गोरले … Read more

वैरणीचा भारा घेऊन पडल्याने यमगे येथील शेतकऱ्याचा मृत्यू

मुरगूड ( शशी दरेकर ) : यमगे ता. कागल येथे वैरणीचा भारा घेऊन येताना पाय घसरून पडल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना यमगे येथे घडली. नामदेव दत्तात्रय मिसाळ (वय ५० वर्षे) असे मयत शेतकऱ्याचे नांव आहे. मुरगूड पोलिस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नामदेव मिसाळ हे गावाच्या … Read more

डी आर माने महाविद्यालयाच्या हिमालयासारखा पाठीशी – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

महाविद्यालयाच्या ५० लाखांच्या सभागृहाची पायाभरणी कागल, दि.११: कागलचे डी आर माने महाविद्यालय हे शहरासह तालुक्याच्या शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मोठे केंद्र आहे. या महाविद्यालयाच्या पाठीशी सदैव हिमालयासारखा मी उभा आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कै. वाय डी माने – अण्णा यांनी प्रतिकूल परिस्थितीतून मोठ्या संघर्षातून वाटचाल करीत समाजाला दिलेली ही … Read more

एस.डी. लाड, अशोक रोकडे व अनुराधा भोसले यांना स्व. दौलतरावजी निकम जीवनगौरव पुरस्कार जाहीर

व्हँनुर (श्रध्दा सुर्वे पाटील) : कागल तालुक्याचे माजी आमदार,ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व.दौलतरावजी निकम यांची ९९ वी जयंती १९ सप्टेंबरला साजरी होत आहे.या निमित्त दरवर्षी शैक्षणिक,सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना स्व.दौलतरावजी निकम जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. यावर्षी जयंती समितीच्यावतीने शैक्षणिक व्यासपीठाचे प्रमुख एस.डी.लाड सर,व्हाईट आर्मीचे प्रमुख अशोक रोकडे व अवनी संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोसले … Read more

सिद्धनेर्ली येथे सार्वजनिक गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याचा निर्णय

सिद्धनेर्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सिद्धनेर्ली तालुका कागल येथील ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये चालू वर्षी सार्वजनिक गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचे काटेकोर पालन करत चालू वर्षी गावातील सर्व गणेश मंडळानी सार्वजनिक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली नाही.

error: Content is protected !!